Rohit Sharma: रोहित शर्मा अडकला? आता इच्छा असूनही मुंबई इंडियन्सला सोडता येणार नाही; कारण...

Rohit Sharma: गुरुवारी आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Feb 23, 2024, 10:14 AM IST
Rohit Sharma: रोहित शर्मा अडकला? आता इच्छा असूनही मुंबई इंडियन्सला सोडता येणार नाही; कारण... title=

Rohit Sharma: मार्च महिन्यापासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. 22 मार्च रोजी आयपीएलचा 17 वा सिझन खेळवला जाणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) ताफ्यात एक मोठा बदल घडला. मुंबईच्या टीमने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधार केलं. दरम्यान या सर्व प्रकारानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) सोडून दुसऱ्या टीममध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता काहीही झालं तरी रोहित शर्मा तसं करू शकणार नाहीये. 

आयपीएलचं शेड्यूल अखेर जाहीर

गुरुवारी आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलच्या सतराव्या सिझनचा ओपनिंग सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान 22 मार्चला खेळवला जाणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 26 तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं

आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) चाहत्यांना एक मोठा धक्का दिला. गुजरात टायटन्ससोबत करार करून मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. इतकंच नाही तर रोहित शर्माला ( Rohit Sharma ) बाजूला सारून कर्णधारपदाची धुरा देखील हार्दिकच्या खांद्यावर दिली. यामुळे मुंबईचे चाहते चांगलेच संतापले होते. यानंतर इतर टीम्सने रोहित शर्माला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी प्रयत्नही केले.

या सर्व घटनेनंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्सची टीम सोडणार अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र आता काहीही झालं तरीही रोहित शर्मा तसं करू शकणार नाहीये. याचं कारण म्हणजे आयपीएलची ट्रेडिंग विंडो बंद झाली आहे. त्यामुळे आता आयपीएलमधील कोणताही खेळाडू टीम बदलण्याबाबत विचार करू शकत नाही. म्हणजेच रोहित शर्मा देखील आता मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) टीम सोडू शकत नाही.  

दिल्ली कॅपिटल्सने रोहितशी केला होता संपर्क

दिल्ली कॅपिटल्सने रोहित शर्माशी ( Rohit Sharma ) संपर्क साधला होता. मात्र तेव्हा रोहित शर्माने स्पष्ट नकार दिल्याचं समजलं होतं. ट्रेडिंग विंडो ओपन असताना दिल्लीने रोहितशी बोलणं केलं. होतं. दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी वक्तव्य केलं होतं की, ऋषभ पंत संपूर्ण सिझनमध्ये कर्णधारपद भूषवू शकेल की नाही हे निश्चित नाही. त्यामुळे दिल्लीची टीम कर्णधार पदाची धुरा सोपवण्यासाठी एका खेळाडूच्या शोधात होती. मात्र मुंबईने रोहितला रिलीज केलं नसल्याचंही समोर आलं होतं.