Rohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी

ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी (India vs Afghanistan) टीम इंडियाने आज मैदानात घाम गाळला. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसून बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पायावर एक बॉल येऊन आदळला.  

Updated: Oct 10, 2023, 10:01 PM IST
Rohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी title=
Rohit Sharma injured before IND vs AFG clash

India vs Afghanistan : टीम इंडियाची वनडे वर्ल्ड कपमधील (World Cup) दुसरी लढत अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) होणार आहे. ही लढत 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होईल. टीम इंडियाने (Indian Cricket Team) पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास सातव्या स्तरावर आहे. अशातच आता दुसरा सामना तोंडावर असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सराव करताना जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने आज मैदानात घाम गाळला. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसून बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माच्या पायावर एक बॉल येऊन आदळला. बॉल लागल्यावर रोहित शर्माला तीव्र वेदना झाल्याचं दिसून आलंय. त्यानंतर लगेच रोहितने उपचार घेतले. मात्र, त्यानंतर तो जास्तवेळ सराव करू शकला नाही. रोहित शर्मा लगेल ड्रेसिंग रुममध्ये परतला. रोहितची ही परिस्थिती पाहून कोच राहुल द्रविड देखील चिंतेत दिसत होते. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. कॅप्टन म्हणून तो यशस्वी राहिला. मात्र, फलंदाज म्हणून रोहित फेल गेला. अशातच आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध रोहितला दोन हात करावे लागणार आहे. रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर आहे? हा देखील एक प्रश्न आहे. 

कशी असेल टीम इंडिया?

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/ मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.