रोमांचक सामन्यात स्पेनचा पराभव, रशिया उपांत्यपूर्व फेरीत

फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची नोंद लागली. 

Updated: Jul 1, 2018, 10:50 PM IST
रोमांचक सामन्यात स्पेनचा पराभव, रशिया उपांत्यपूर्व फेरीत title=

कझान : फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची नोंद लागली. यजमान रशियानं माजी विजेत्या स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.. रशियानं स्पेनवर ४-३नं मात केली. दोन्ही संघांनी निर्णायक वेळेत १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही संघांना अतिरिक्त वेळही देण्यात आला, पण यजमान रशिया आणि स्पेनला गोल झळकवण्यात अपयश आलं. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियानं बाजी मारली. १९७० नंतर रशियानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाच्या गोलरक्षकानं स्पेनचा मारा रोखला.