सचिन तेंडुलकरला निवृत्तीनंतरही पुरस्कार

 जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार जाहीर 

Updated: Feb 18, 2020, 08:14 AM IST
सचिन तेंडुलकरला निवृत्तीनंतरही पुरस्कार  title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मैदानातील कारकिर्द साऱ्या जगाने पाहीली. निवृत्तीनंतरही सचिन नावाची जादू कमी होताना दिसत नाही. क्रीडा क्षेत्रात मानाचा म्हणून ओळखला जाणारा लॉरेस स्पोर्टींग मोमेंट २०००-२०२० पुरस्कार सचिन तेंडुलकरने पटकावला आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार जाहीर झालाय. 

या पुरस्काराला 'कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असं शीर्षक देण्यात आलंय. सचिन तेंडुलकरने कारकिर्दीत ६ विश्वचषक खेळले. त्यापैकी सहावा म्हणजे २०११ सालचा विश्वचषक भारताने जिंकला होता. 

त्यावेळी सचिन तेंडुलकरला संघ सहकाऱ्यांना खांद्यावर उचलून घेत मैदानाला विजयी फेरी मारली होती. लॉरेसचा स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन आणि फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांना जाहीर झालाय.