Sachin Tendulkar: "मला कॅप्टन्सीची ऑफर आली होती, मात्र...", 15 वर्षानंतर सचिनने केला 'हा' खुलासा!

Sachin Tendulkar On MS Dhoni: राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत आणि संयमी खेळाडू तर दुसरीकडे धोनी म्हणजे स्मार्ट कर्णधार... जो विरोधी संघापेक्षा एक पाऊल पुढे असत, असा खेळाडू वाटला.‌ मात्र...

Updated: Dec 23, 2022, 11:08 AM IST
Sachin Tendulkar: "मला कॅप्टन्सीची ऑफर आली होती, मात्र...", 15 वर्षानंतर सचिनने केला 'हा' खुलासा! title=
Sachin Tendulkar,MS Dhoni

Sachin Tendulkar on MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) म्हणजे क्रिडाविश्वातील नावाजलेलं नाव... भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली. धोनीचा जलवा आजही आयपीएलमध्ये (IPL) पहायला मिळतो. मात्र, धोनी टीम इंडियाचा कॅप्टन झाला आणि आयसीसीच्या ट्रॉफ्या भारताच्या पदरी पडू लागल्या. धोनीला कर्णधार बनवण्यात सर्वात मोठा हात सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) होता. अशातच एका कार्यक्रमात बोलताना सचिनने मोठा खुलासा केलाय. (sachin tendulkar reveals the reason why he recommended ms dhoni name for team india captaincy marathi news)

एक काळ होता, ज्यावेळी धोनी (MS Dhoni) आण सचिन (Sachin Tendulkar) यांमध्ये फाईट असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे 2007 साली ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) देखील तणावाचं वातावरण असायचं. अशातच आता 15 वर्षानंतर सचिन तेंडूलकरने मोठा खुलासा केलाय.

काय म्हणाला सचिन?

ज्यावेळी मी इंग्लंडमध्ये (IND vs ENG) होतो, त्यावेळी मला संघाचं नेतृत्व करण्याबाबत विचारलं गेलं होतं. त्यावेळी मी धोनीचं (Mahendra Singh Dhoni) नाव सुचवलं. तो पुरेसा अनुभवी नव्हता. मात्र, मी त्याच्यासोबत स्लीपमध्ये असताना धोनी ज्या काही गोष्टी बोलायचा, त्यावरून तो एक चांगलं नेतृत्व करू शकतो, हे दिसत होतं, असं सचिनने (Sachin Tendulkar On MS Dhoni) सांगितलं.

आणखी वाचा - IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राहुल द्रविड (Rahul Dravid) शांत आणि संयमी खेळाडू तर दुसरीकडे धोनी म्हणजे स्मार्ट कर्णधार... जो विरोधी संघापेक्षा एक पाऊल पुढे असत, असा खेळाडू वाटला.‌ सामना जिंकण्याची एक प्रक्रिया असते. क्रिकेटमध्ये दिवसाअखेर स्कोरबोर्ड महत्त्वाचा असतो. धोनी त्या प्रक्रियेनं चालणारा खेळाडू मला वाटला, त्यामुळं मी त्याच्या नावाची शिफारस केली होती, असं (Recommended MS Dhoni Name) वक्तव्य सचिनने केलं आहे.