Video शिक्षक दिनानिमित्त सचिनने शेअर केली खास आठवण

गणेश विसर्जनासोबतच देशभरात आज शिक्षक दिनाचा उत्साह बघायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्या गुरुंचे, शिक्षकांचे आपापल्या पद्धतीने आभार मानत आहेत.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Sep 5, 2017, 12:20 PM IST
Video शिक्षक दिनानिमित्त सचिनने शेअर केली खास आठवण title=

मुंबई : गणेश विसर्जनासोबतच देशभरात आज शिक्षक दिनाचा उत्साह बघायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्या गुरुंचे, शिक्षकांचे आपापल्या पद्धतीने आभार मानत आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या गुरूबद्दलही खूपकाही बोललं आणि लिहिलं गेलं आहे. आजच्या या खास दिवसानिमित्त सचिनने एक व्हिडिओ शेअर केलाय. 

सचिन तेंडुलकर याने या व्हिडिओत आचरेकर सरांची एक आठवण शेअर केली आहे. या एका घटनेने सचिनचं आयुष्य बदलल्याचं तो म्हणाला आहे. सचिनने नेहमीच आचरेकर सरांना त्याच्या यशासाठी महत्वाचा भागीदार मानले आहे. वेळोवेळी त्याने त्यांना गुरूदक्षिणाही  दिली आहे. 

आज पुन्हा एकदा सचिनने आचरेकर सरांसोबतच एक किस्सा सर्वांसमोर आणला आहे.