सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Mar 27, 2021, 10:45 AM IST
सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (Sachin Tendulkar tested positive for corona) याबाबत सचिन याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, सचिनच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. सचिन सध्या होम क्वारन्टाईन झाला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाल्याचे त्याने सांगितले आहे. आज शनिवारी सचिनने ही माहिती सोशल मीडियावरुन सांगितली. माझ्या कुटुंबीयांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईन झालो आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक प्रोटोकॉलनुसार मी काळजी घेत आहे. मला आणि देशभरातील चाहत्यांकडून पाठिंबा मिळत आहे. तसेच सर्व हेल्थकेअर व्यावसायिकांचे आभार मानायचे आहेत. तुम्ही सर्वांची स्वत:ची काळजी घ्या, असे सचिनने ट्विट केले.