मुंबई : शनिवारची रात्री बॉलिवूडच्या सितार्यांसोबतच खेळजगतातील काही खेळाडूदेखील झगमगताना दिसत होते.
विराट कोहली फाऊंडेशन आयोजित एका खास इव्हेंटमध्ये खेळाडू आणि सेलिब्रिटी एकत्र आले होते. 'स्पोर्ट्स ऑनर' असे या खास कार्यक्रमाचे नाव होते.
विराट कोहली, अनुष्का शर्मा सोबतच बॅटमिंटनपटू सायना नेहवाल, पि व्ही सिंधू पोहचले होते. नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला आशीष नेहरादेखील सपत्निक या कार्यक्रमामध्ये पोहचला होता.
टेनिसपटू सानिया मिर्झा खास दोस्त आणि दिग्दर्शिका, कोरिओग्राफर फराह खानसोबत पोहचली होती. या कार्यक्रमामध्ये झहीर खान आणि सागरिका घाटगेदेखील पोहचले होते.
With my beautiful +1 for the Indian Sports Honors Awards @TheFarahKhan pic.twitter.com/R1ZvrcLYpm
— Sania Mirza (@MirzaSania) November 11, 2017
Video : #PVSindhu & #SainaNehwal At Indian Sports Honours Awards 2017https://t.co/W2lVENtalv pic.twitter.com/IVUPTJwL4x
— bollywood helpline (@BollywoodH) November 12, 2017
Lovely dress by @neeta_lulla .... for the #IndianSportsHonours awards 2017 ... pic.twitter.com/onzFokltdz
— Saina Nehwal (@NSaina) November 11, 2017
सायनाने नुकतीच पी. व्ही. सिंधूवर मात करून राष्ट्रीय बैडमिंटन हा किताब पटकवला आहे. अनेकांचे लक्ष वेधून घेणार्या सायना नेहवालचा ड्रेस प्रसिद्ध सेलिब्रिटी ड्रेस डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाईन केला होता .