बीसीसीआयच्या 'त्या' निर्णयावर साक्षी नाराज

भारतामध्ये क्रिकेट खेळाडू आणि दुसऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नेहमीच चर्चा होते. 

Updated: Nov 16, 2017, 05:21 PM IST
बीसीसीआयच्या 'त्या' निर्णयावर साक्षी नाराज  title=

मुंबई : भारतामध्ये क्रिकेट खेळाडू आणि दुसऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नेहमीच चर्चा होते. भारतीय क्रिकेटपटूंना विमानातून बिजनेस क्लासनं प्रवास करायला परवानगी देण्यात आली आहे. खेळाडूंच्या खेळावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयच्या निर्णयावर रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवणाऱ्या साक्षी मलिकनं प्रतिक्रिया दिली आहे. ही सुविधा इतर खेळाडूंनाही मिळाली पाहिजे जे दुसऱ्या देशात जाऊन देशाचं प्रतिनिधीत्व करतात. लांबच्या विमान प्रवासामुळे खेळाडूंना जेट लॅगचा त्रास होतो. बिजनेस क्लासमधून प्रवास केल्यामुळे जेटलॅगची समस्या कमी होते, असं साक्षी म्हणाली आहे. दुसऱ्या खेळाडूंनाही बिजनेस क्लासनं प्रवास करायला परवानगी मिळाली पाहिजे, अशी मागणीही साक्षी मलिकनं केली आहे. क्रिकेटपटू सोडून इतर खेळाडूंना सावत्र वागणूक मिळत असल्याची भावनाही साक्षीनं व्यक्त केली आहे.