सानिया मिर्झाला शोएब मलिकची 'ही' गोष्ट पसंत नाही

शोएब मलिकबाबत सानिया मिर्झाचा मोठा खुलासा

Updated: May 25, 2020, 07:04 PM IST
सानिया मिर्झाला शोएब मलिकची 'ही' गोष्ट पसंत नाही

मुंबई : भारतीय टेनिस सुपरस्टार सानिया मिर्झाने (Sania Mirza) पाकिस्तानच्या खेळाडू पत्रकाराशी बोलताना पती शोएब मलिक (Shoaib Malik) च्या आयुष्यातील खूप महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. सानियाने शोएब मलिकच्या न आवडणाऱ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्या गोष्टींचा सर्वात जास्त सानियाला त्रास होतो. 

जेव्हा पण शोएब आणि सानियाचं भांडण होतं तेव्हा शोएब पूर्णपणे गप्प राहतो. काहीच प्रतिक्रिया देत नाही. शोएब भांडताना आपल्या मनातलं काहीच बोलत नाही. तो गप्प राहतो आणि विषय संपवण्याचा विचार करत नाही. शोएबची हीच गोष्ट सानियाला आवडत नाही.

सानिया आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने २०१० मध्ये लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. सानिया भारतातील यशस्वी टेनिस खेळाडू तर शोएब पाकिस्तान संघातील खेळाडू.

१० वर्षांनंतरही दोघांच प्रेम अजिबात कमी झालं नाही. दोघंही कायम एकमेकांबद्दलचे फोटो शेअर करत असतात. या दोघांना एक गोंडस मुलगा असून शोएब आणि सानियाने त्यांच नाव इजहान मिर्झा मलिक असं ठेवलं आहे.   

सानियाने पाकिस्तानच्या खेळ विशेष तज्ज्ञ अब्बास यांच्यासोबत शोएब आणि तिच्या लग्नाबाबतच्या खास गोष्टी शेअर केल्या. आमचा वाद झाला की, शोएब वाद झाल्यावर काहीच बोलत नाही. शांत राहण पसंत करतो. तो शांत राहतो आणि वाद टाळतो. हा त्याचा स्वभाव सानियाला पटत नाही.