Sania Mirza and Shoaib Malik: घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सानिया मिर्झाचे जुनं अफेर पुन्हा चर्चेत!

Sania Mirza and Shoaib Malik: काही दिवसांपूर्वी सानियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Updated: Nov 10, 2022, 04:33 PM IST
Sania Mirza and Shoaib Malik:  घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना सानिया मिर्झाचे जुनं अफेर पुन्हा चर्चेत! title=

Sania Mirza and Shoaib Malik : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मात्र, त्यांच्या घटस्फोटाचं कारण काय असा प्रश्न त्या दोघांच्या चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी सानियानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ही चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आता सानिया मिर्झाचा कॉफी विथ करण या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : पुन्हा एकदा तेच.... दिशा पटानीचे Lingerie मधले फोटो Viral

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला करण त्याच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारतो. 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये सानिया मिर्झा आणि फराह खाननं हजेरी लावली होती. यावेळी करणनं सानियाला विचारलं की 'तू शाहिद कपूरला डेट केले आहेत का? कारण बऱ्याच दिवसांपासून तुझं आणि शाहिदचं नाव जोडलं जात आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय म्हणाली सानिया? 

करणच्या या प्रश्नावर उत्तर देत सानिया म्हणाली, 'मला याबद्दल काही आठवत नाही कारण मी खूप जास्त प्रवास करते.' सानियाचं हे उत्तर ऐकल्यानंतर फराह आणि करण तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागले. शाहिदचा करीना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सानिया आणि शाहिद रिलेशनशिपमध्ये आल्याचे म्हटले जाते. एवढंच नाही तर त्या दोघांना बऱ्याचवेळा मुंबईतील हॉटेलमध्ये स्पॉट करण्यात आले होते. मात्र, काही दिवसानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. (Sania Mirza s old affair are on the top of discussion after her divorce news)