विराट कोहलीच्या शतकांबाबत माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

विराट यंदा शतकांचं अर्धशतक पूर्ण करणार का? संजय बांगर यांचे मोठं वक्तव्य!

Updated: Jan 1, 2023, 09:52 PM IST
विराट कोहलीच्या शतकांबाबत माजी प्रशिक्षक संजय बांगर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले... title=

Sanjay Bangar on Virat Hundread : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत 44 शतके केली आहेत. 50 शतके पूर्ण करण्यापासून सहा शतके दूर आहे. विराटला 44 वं शतक करायला वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला. आता एकदिवसीय वर्ल्ड कप 2023  असून या वर्षामध्ये विराटलाही संधी आहे. याबाबत भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar on Virat Kohli) यांना विचारलं असता यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Bangar on Virat Kohli Hundread latets marathi sport news)

स्टार स्पोर्ट्स शो 'गेम प्लॅन' या शोमध्ये संजय बांगर (Sanjay Bangar) यांना, विराट 2023 मध्ये 50 शतके पूर्ण करणार का? असा सवाल विचारण्यात आला. यावर, विराटला पूर्ण ताकदीने फलंदाजी करावी लागेल. वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) भारत अंतिम सामन्यापर्यंत गेला तर भारताचे एकूण 26 किंवा 27 सामने एकदिवसीय होतील. मला वाटतं की विराट ही ऐतिहासिक कामगिरी करण्यात यशस्वी ठरेल असं मला वाटत नाही मात्र तो जवळपास नक्की पोहोचेल, असं संजय बांगर यांनी म्हटलं आहे.  

विराट कोहली 5 शतकांनंतर वनडे क्रिकेटमध्ये 50 शतके करणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर 49 शतके आहेत. त्यामुळे विराटने यंदाच्या वर्षी सहा शतके करत मोठा विक्रम करण्याची संधी  आहे. 

दरम्यान, यंदाचा वर्ल्ड कपल भारतातच होणार असल्याने यजमान भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणार आहे. टीम मॅनेंजमेंटही आतापासून संघ बांधणीच्या तयारीला लागले आहेत. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असणार असून वर्ल्ड कप स्कॉडची अद्याप घोषणा झालेली नाही.