मोठी बातमी! रोहित शर्मा जखमी असताना Sanju Samson ची कर्णधारपदी नियुक्ती

न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये संजूला बेंचवर बसवलं होतं. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) संताप व्यक्त केला होता. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजू सॅमसनला कर्णधारपद (Sanju Samson captain) देण्यात आलं आहे.

Updated: Dec 8, 2022, 09:21 PM IST
मोठी बातमी! रोहित शर्मा जखमी असताना Sanju Samson ची कर्णधारपदी नियुक्ती title=

Sanju Samson captain : सध्या सोशल मीडियावर संजू सॅमनला (Sanju Samson) टीम इंडियामध्ये (Team India) घेण्यात यावं अशी चर्चा सुरु आहे. टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 world cup) भारताने न्यूझीलंडचा (Ind vs NZ) दौरा केला होता. यावेळी एका वनडे सामन्यात त्याला स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्याव्यतिरीक्त संजूला बेंचवर बसवलं होतं. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) संताप व्यक्त केला होता. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजू सॅमसनला कर्णधारपद (Sanju Samson captain) देण्यात आलं आहे.

लवकरच देशांतर्गत रणजी ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. यामध्ये अनेक नवख्या आणि युवा खेळाडूंचा खेळ पाहिला जातो. या स्पर्धेत चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूला टीम इंडियाचे दरवाजे खुले केले जातात. याच रणजी ट्रॉफीच्या नव्या सिझनमध्ये संजू सॅमसनला नवी जबाबदारी देण्यात येणार आहे.

केरळ टीमच्या कर्णधारपदी Sanju Samson ची वर्णी

भारतीय क्रिकेट टीमचं नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला रणजी ट्रॉफीमध्ये केरळच्या 2 सामन्यांसाठी कर्णधार बनवण्यात आलंय. मुख्य म्हणजे, संजूला कर्णधारपदाचा चांगलाच अनुभव आहे. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची कमान सांभाळली होती. इतकंच नाही तर त्याने आयपीएल 2022 मध्ये टीमला फायनलपर्यंतही पोहोचवलं होतं.

संजू सॅमसनचं आंतरराष्ट्रीय करियर

संजू सॅमसनने आतापर्यंत फर्स्ट क्लास करियरमध्ये एकूण 55 सामने खेळले आहे. ज्यामध्ये त्याने 37.64 च्या सरासरीने फलंदाजी करत 3162 रन्स केले आहेत. ज्यामध्ये 10 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

Suryakumar Yadav देखील खेळणार रणजी

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव आता रणजी ट्रॉफी 2022-23 (Ranji Trophy 2022-23) च्या सीझनमध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. 27 डिसेंबर रोजी सौराष्ट्र विरूद्ध पहिला सामना खेळला जाणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सुर्यकुमारचा जलवा पहायला मिळू शकतो.

13 डिसेंबर पासून सुरु होतेय रणजी ट्रॉफी

बीसीसीआयकडून दरवर्षी रणजी ट्रॉफीचं आयोजन करण्यात येतं. ज्यामध्ये तरूण खेळाडू त्यांच्या उत्तम खेळाचं प्रदर्शन करतात. रणजी ट्रॉफी 2022-23 चा सिझन 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ज्याचा अंतिम सामना 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी यांच्यामध्ये रंगणार आहे. अशामध्ये सर्वांचं लक्ष Suryakumar Yadav च्या खेळावर असणार आहे.