IND vs BAN: "रोहित खेळणारच होता तर...", पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!

Rohit Sharma thumb injury: रोहित शर्माने धाडसी निर्णय घेत मैदानात उतरला आणि भारताला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित अँड कंपनीला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Updated: Dec 8, 2022, 08:21 PM IST
IND vs BAN: "रोहित खेळणारच होता तर...", पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले! title=
Sunil Gavaskar On Rohit Sharma

Sunil Gavaskar On Rohit Sharma: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपासून टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना दुखापतींचं ग्रहण लागलंय. ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोहम्मद शमी (Mohammed Shami),  कुलदीप सेन (Kuldeep Sen), दीपक चहर (Deepak Chahar) हे खेळाडू जखमी असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील जखमी झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सामना सुरू असताना रोहित शर्मा दुखापतग्रस्त (Rohit Sharma thumb injury) झाला. त्यानंतर त्याने धाडसी निर्णय घेत मैदानात उतरला आणि भारताला पराभवापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. बांग्लादेश जिंकणार, असं वाटत असताना रोहित (Rohit Sharma) मैदानात 10 व्या खेळाडूच्या रुपाने आला आणि सामना पलटी केला. मात्र, अखेरच्या बॉलवर षटकार मारण्याची गरज असताना बांग्लादेशने सामना जिंकला. त्यावरून आता माजी दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्माला निशाण्यावर घेतलं आहे.

काय म्हणाले Sunil Gavaskar ?

रोहित शर्माची गुणवत्ता आणि क्लास सर्वांनाच माहीत आहे. भारत विजयाच्या एवढा जवळ आला असताना रोहित प्रथम फलंदाजीला का आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर तो 9 व्या क्रमांकावर बॅटिंग करणार असेल तर त्यानं 7 व्या क्रमांकावर बॅटिंग करायला हवी होती. तो करू शकला असता असं मला वाटतं. अक्षर पटेल त्याच्यापेक्षा थोडा वेगळा खेळ करू शकला असता, असंही सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar On Rohit Sharma) म्हणाले आहेत.

आणखी वाचा - WATCH: "मी जखमी झालो नव्हतो, मला..." Shaheen Shah हे काय बोलला? तुफान व्हायरल होतोय Video!

दरम्यान, फिल्डिंग करत असताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत (Rohit Sharma injury) झाली होती. मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्लिपमध्ये फिल्डिंग करताना रोहित शर्माला दुखापत झाली. यानंतर तो रडताना देखील दिसला. त्यानंतर रोहितला मैदान देखील सोडावं लागलं. त्याच्या जागी रजत पाटीदार मैदानात आला. मात्र, जखमी असताना देखील बांग्लादेशच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी उतरल्याने रोहितचं कौतूक देखील होताना दिसतंय.