पाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. या मॅचनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंची खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली.

Updated: Jun 20, 2017, 04:09 PM IST
पाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत  title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. या मॅचनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंची खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली. मॅच झाल्यानंतर दोन्ही देशांचे खेळाडू खेळीमेळीत एकमेकांशी बोलताना दिसत होते. 

पण प्रेक्षकांसाठी हा सामना लढाईपेक्षा कमी नव्हता. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना चिडवलं. मॅच संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये जाताना भारतीय खेळाडूंना उद्देशून पाकिस्तानी प्रेक्षकांनी आक्षेपार्ह वर्तन केलं.

पाकिस्तानी प्रेक्षकाच्या या चिडवण्यावर भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी चांगलाच भडकला. भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जात असताना पाकिस्तानी प्रेक्षकांनी बाप कौन है असा प्रश्न विचारला. हे ऐकून मोहम्मद शमी चांगलाच भडकला. त्या प्रेक्षकाकडे जायचा प्रयत्न शमीनं केला पण धोनीनं मध्यस्ती करत शमीला शांत केलं.

पाहा स्टेडियममध्ये नेमकं काय झालं