शेन वॉर्नचं आयपीएलमध्ये कमबॅक, बजावणार ही भूमिका

आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देणाऱ्या शेन वॉर्नचं १० वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे.

Updated: Feb 13, 2018, 03:57 PM IST
शेन वॉर्नचं आयपीएलमध्ये कमबॅक, बजावणार ही भूमिका  title=

मुंबई : आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून देणाऱ्या शेन वॉर्नचं १० वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक झालं आहे. शेन वॉर्नची राजस्थान रॉयल्स टीमचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २००८ साली शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सनं आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. कोणताही बडा खेळाडू टीममध्ये नसताना राजस्थाननं ही उल्लेखनीय कामगिरी केली होती. आता दोन वर्षांच्या बंदीनंतर राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार आहे.

कमबॅकमुळे वॉर्न खुश

राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये कमबॅक केल्यामुळे मी खुश आणि उत्साही असल्याची प्रतिक्रिया शेन वॉर्ननं दिली आहे. टीममध्ये युवा खेळाडू आहेत, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सूक आहे, असं वॉर्न म्हणालाय. २००८ ते २०११ पर्यंत शेन वॉर्न राजस्थानचा कॅप्टन होता. ५२ मॅचमध्ये शेन वॉर्ननं ५६ विकेट घेतल्या होत्या.

राजस्थाननं विकत घेतले सगळ्यात महाग खेळाडू

आयपीएल लिलावामध्ये राजस्थाननं दोन सगळ्यात महागडे खेळाडू विकत घेतले. बेन स्टोक्सला १२.५ कोटी तर जयदेव उनाडकटला ११.५ कोटी रुपयांना राजस्थाननं विकत घेतलं. तसंच राईट टू मॅचचा वापर करुन राजस्थाननं अजिंक्य रहाणेला ४ कोटी आणि धवल कुलकर्णीला ७५ लाख रुपयांना टीममध्ये कायम ठेवलं.

अशी आहे राजस्थानची टीमचा

स्टिव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डार्सी शॉर्ट, संजू सॅमसन, प्रशांत चोप्रा, धवल कुलकर्णी, आर्यमन बिर्ला, जोफ्रा आर्चर, बेन लॉफलिन, अनुरीत सिंग, दुश्मान्था चमीरा, जहीर खान, मिधुन एस, अंकित शर्मा, स्टुअर्ट बिनी, कृष्णप्पा गौतम, जतिन सक्सेना, श्रेयस गोपाल, महिपाल लोमरोर