Shardul Thakur Engagement : शार्दुल ठाकूरचा साखरपुडा मुंबईत पार

बोहल्यावर लवकरच चढणार 

Updated: Nov 29, 2021, 12:43 PM IST
Shardul Thakur Engagement : शार्दुल ठाकूरचा साखरपुडा मुंबईत पार

मुंबई : Shardul Thakur Engagement : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचा आज साखरपुडा आहे. खूप दिवसांपासून असलेल्या रिलेशनशिपला शार्दुल आता नात्याचं नाव देत आहे. शार्दुलची गर्लफ्रेंड मिताली पारूलकरसोबत साखरपुडा होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आवार असलेल्या बीकेसी येथे एका छोट्या सोहळ्यात हा साखरपुड्याचा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमात एकूण 75 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. जे सर्व कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र असतील. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shardul Thakur FC (@shardulthakur16)

साखरपुड्यानंतर जवळपास एक वर्षांनी शार्दुल ठाकूर आणि मिताली पारूलकर लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकानंतर दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shardul Thakur FC(@shardulthakur16)

शार्दुल ठाकूरने गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात आपले स्थान पक्के केले आहे. वेगवान गोलंदाजी आणि अष्टपैलू असल्याने त्याच्याकडे हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणूनही पाहिले जात आहे. शार्दुलने भारतासाठी चार कसोटी, १५ वनडे आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. 

हा 30 वर्षीय अष्टपैलू खेळाडू 2021 च्या टी-20 विश्वचषकात भारताच्या संघाचा महत्त्वाचा भाग होता. सध्या न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात शार्दुल ठाकूरला विश्रांती देण्यात आली आहे.