Sania Mirza-Shoaib Malik: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. सानिया आणि शोएब (sania mirza age) यांचा घटस्फोट झाला असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत, पण दोघांनी अद्याप घटस्फोटाबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाला पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमर (Ayesha Omar) कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे.
सानिया आणि शोएबचा सुखी संसारमध्ये विघ्न आयशा उमरमुळे आल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे आयशा प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. आता सर्व वादग्रस्त परिस्थितीवर खद्द पाकिस्तानच्या अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. जगात असं नातं असतं... असं म्हणत अभिनेत्रीने सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. (Ayesha Omar-Shoaib Malik)
सोशल मीडियावर एका युजरने आयशाला विचारलं 'तुम्ही दोघं लग्न करणार आहात का?' यावर अभिनेत्री म्हणाली, 'आम्ही लग्न करणार नाही. शोएबचं लग्न झालं आहे आणि तो त्याच्या पत्नी आणि मुलासोबत प्रचंड आनंदी आहे. मी शोएब आणि सानिया दोघांचा आदर करते.' (sania mirza and shoaib malik)
Ayesha Omar has a beautiful response for a commenter asking if she's getting married to Shoaib Malik #AyeshaOmar #SaniaMirza #ShoaibMalik pic.twitter.com/JpI2PtkTzC
— Galaxy Lollywood (@galaxylollywood) November 8, 2021
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'शोएब आणि मी एकमेकांचे चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांची प्रचंड काळजी घेतो. जगभरात असे अनेक नाती आहेत.' असं देखील अभिनेत्री आयशा उमर म्हणाली. (Ayesha Omar instagram)
सानिया शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये आयशा उमरचं नाव का येतय समोर
शोएब मलिक आणि पाकिस्तानी मॉडेल आयशा उमर यांनी एकत्र बोल्ड फोटोशूट केलं. बोल्डफोटोशूटनंतर शोएबसोहत आयशाचं नाव जोडण्यात आलं. शोएब आणि आयशाचं अफेअर असल्याचं बोललं जाऊ लागलं. या अफेअरवर नाराज असलेली सानिया त्याला तलाक देणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. (sania mirza divorce with shoaib malik)