Shubman Gill injured : इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) तिसरा सामना खेळवला जातोय. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात फारच खराब झाली. इतकंच नाही तर टीम इंडियाला (TeaM India) एक मोठा धक्का देखील बसला आहे.
टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी उतरले होते. यावेळी रोहितने 12 तर शुभमनने 21 रन्सची खेळी केली. याचदरम्यान शुभमन गिलला दुखापत झाल्याचं समोर आलंय. शुभमनच्या पोटाला जखम झाली असून पुढच्या सामन्यासाठी तो उपलब्ध असणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान याबाबत अजून अधिकृरित्या काही माहिती देण्यात आली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या सामना के.एल राहुलच्या जागी शुभमन गिलला प्लेईंग 11 मध्ये सहभागी करण्यात आलं. यावेळी 7 वी ओव्हर शुभमन गिलला चांगलीच भारी पडली. या ओव्हरमध्ये एक रन करण्याच्या नादात त्याला दुखापत झाली आहे. यावेळी त्याच्या पोटाला जखम झाली असून त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. त्याला झालेल्या जखमेतून रक्तस्राव देखील होत होता. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात तो खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Shubham Gill run for Quick single got small crack in stomach#IndvsAus pic.twitter.com/UeiLPjjf9i
— Ronakians (@ronakians) March 1, 2023
शुभमन गिल स्टार्कच्या दुसऱ्या बॉलवर रन काढण्यासाठी धावत होता आणिा याचवेळी गिलला दुखापत झाली. ज्यावेळी गिल रन पूर्ण करण्यासाठी उडी मारली तेव्हा जमिनीवर तो घासला गेला आणि त्याला जखम झाली.
रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचे फलंदाज फ्लॉप गेले. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत. यावेळी विराटने सर्वाधिक म्हणजेच 22 रन्स केले. त्यानंतर शुभमन गिलने 21 रन्सची खेळी केली. रोहित शर्मा 12, भरत 17 तर अक्षर पटेल 12 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. कांगारूंच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संघ- ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स केरी (डब्ल्यूके), कॅमरून ग्रीन, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन.