Prithvi Shaw Selfie Row: पृथ्वी शॉने माझ्या Private Part ला...; सपना गिलचा खळबळजक आरोप, मोठा ट्विस्ट

Prithvi Shaw Selfie Row: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ (Indian cricketer Prithvi Shaw) आणि सपना गिल (social media influencer Sapna Gill) वाद प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सपना गिलने पृथ्वी शॉवर खळबळजनक आरोप केला असून वादाला (Prithvi Shaw Selfie Row) वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान सपनाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.   

Updated: Feb 22, 2023, 09:02 PM IST
Prithvi Shaw Selfie Row: पृथ्वी शॉने माझ्या Private Part ला...; सपना गिलचा खळबळजक आरोप, मोठा ट्विस्ट title=

Prithvi Shaw Selfie Row: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉसह (Indian cricketer Prithvi Shaw) गैरवर्तन तसंच त्याच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलने (social media influencer Sapna Gill) खळबळजनक आरोप केले आहेत. सपना गिलने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर आपला लैंगिक छळ केल्याचा मोठा आरोप केला आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत सपना गिलने आपण पृथ्वी शॉकडे सेल्फी मागितल्याचा दावा फेटाळून लावला असून, आपल्याविरोधातील सर्व आरोपही फेटाळले आहेत. आपण पैशांसाठी कोणावरही हल्ला केला नाही असं सपना गिलचं म्हणणं आहे. 

सपना गिलने पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांवर आपल्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. सपना गिलच्या म्हणण्यानुसार, तिच्या गुप्तांगाला हात लावण्यात आला. तसंच आपल्या मित्राची सुटका कऱण्याचा प्रयत्न केला असता बेसबॉलने मारहाण करण्यात आली. 

"आम्ही कोणालाही मारहाण केली नाही. तसंच आम्ही कोणाकडेही पैसे किंवा सेल्फी मागितले नाहीत. आम्ही तिथे मजामस्ती करत असताना मित्राने व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. ते माझ्या मित्राला मारहाण करत होते," असा सपना गिलचा दावा आहे.

कथितपणे पृथ्वी शॉने सेल्फीसाठी नकार दिल्यानंतर सपना आणि तिचा मित्र शोभित ठाकूर यांचा त्याच्याशी वाद झाला. यानंतर त्यांनी पृथ्वी शॉला धक्काबुक्की केली आणि बेसबॉलने त्याच्या कारवर हल्ला केला. ओशिवरा पोलिसांनी सपना गिलला अटक केली आणि इतर सात जणांविरोधातही गुन्हा दाखल केला.

सपनाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ आणि इतरांविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई कोर्टाने सपना आणि इतर चौघांना जामीन मंजूर केला आहे. 

"मी तिथे त्यांना थांबवण्यासाठी गेले होते. याचा पुरावा असावा म्हणून माझ्या मित्रांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. मी मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना बेसबॉलने मला मारहाण केली. एक ते दोघांनी मला मारहाण केली आणि गुप्तांगाला हात लावला. त्यांना मला कानाखालीही मारली," असा सपनाचा दावा आहे.

"पृथ्वी शॉ, आशिष सुरेंद्र यादव, ब्रिजेश आणि इतरांविरोधात कलम 34, 120b, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354 आणि 509  अन्वये सपना गिलचा विनयभंग आणि विनयभंग करण्याच्या बेकायदेशीर कृत्यांसाठी फौजदारी तक्रार नोंदवण्यात आली आहे," अशी माहिती सपनाच्या वकिलांनी दिली आहे.