महिला टी20 वर्ल्ड कप सुरु असतानाच 'या' क्रिकेटपटूने दिली गुडन्यूज, लेस्बियन पार्टनर गरोदर

दक्षिण आफ्रिकेत महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप खेळला जात आहे. यादरम्यानच दिग्गज महिला क्रिकेटपटून आपली पार्टनर गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

Updated: Feb 22, 2023, 08:24 PM IST
महिला टी20 वर्ल्ड कप सुरु असतानाच 'या' क्रिकेटपटूने दिली गुडन्यूज, लेस्बियन पार्टनर गरोदर title=

Sarah Taylor Partner Pregnant: इंग्लंडची दिग्गज महिला क्रिकेटपटू सारा टेलरच्या (Sara Taylor) घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. साराने सोशल मीडियावर (Social Media) फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. साराने आपली पार्टनर डायना (Diana) गरोदर असल्याची माहिती दिली आहे. सारा टेलरने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतली आहे. 

सारा टेलरने आपली पार्टनर डायनाबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत तीने एक कॅप्शनही दिला आहे, यात तीने म्हटलंय, 'हा प्रवास इतसा सोपा नव्हता, पण आता आनंद होतोय, आई होणं हे माझ्या पार्टनरचं स्वप्न होतं, हा प्रवास खडत होता, पण डायनाने कधीच हार मानली नाही. ती एक चांगली आई होईल आणि याची मी एक हिस्सा असेन, त्यामुळे मला खूप आनंद होतोय, 19 आठवड्यानंतर आयुष्य खूप बदलेलं असेल' असं साराने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

सारा टेलरच्या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपू अॅडम गिलख्रिस्टनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, शुभेच्छा लीजेंड, एका शानदार यात्रा तुमची वाट पाहातेय, असं त्याने म्हटलं. महिला क्रिकेटमधल्या सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंमध्ये सारा टेलरचं नाव घेतलं जातं. पण मानसिक तणावामुळे तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

सारा टेलरने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला. त्यानंतर तीने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण केलं. तिच्या नेतृत्वात इंग्लंडने एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला. 2006 मध्ये इंग्लंड क्रिकेट संघात डेब्यू करणारी सारा इंग्लंडसाठी तब्बल 226 सामने खेळली. यात 10 कसोटी सामने, 126 एकदिवसीय आणि 90 टी20 सामन्यांचा समावेश आहे. 

सारा टेलरने तीन वेळा आयसीसी वुमन क्रिकेटर ऑफ द इयचा पुरस्कार पटकावला आहे. 2014 मध्ये तिला वुमन वनडे क्रिकेटर ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाला.  2009 आणि 2017 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाची ती हिस्सा होती. 2009 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंड संघातही तिचा समावेश होता. 

सारा टेलर आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक किस्सा चांगलाच रंगला होता. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असणारा विराट कोहली सारा टेलरला भेटायला सकाळी पाच वाजता तिच्या हॉटेलवर पोहोचला होता. सारा टेलरने विराट कोहली आपला फेव्हरेट क्रिकेटर असल्याचं म्हटलं होतं.