close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

केएल राहुलसोबत डेटिंगचा प्रश्न, बॉलीवूड अभिनेत्री म्हणते...

इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता अवघे काही तास उरले आहेत.

Updated: May 29, 2019, 10:50 PM IST
केएल राहुलसोबत डेटिंगचा प्रश्न, बॉलीवूड अभिनेत्री म्हणते...

मुंबई : इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता अवघे काही तास उरले आहेत. गुरुवारपासून क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला. केएल राहुल आणि एमएस धोनीने या मॅचमध्ये शतकं केली. केएल राहुलने केलेल्या शतकामुळे चौथ्या क्रमांकावर तोच खेळेल, असं बोललं जात आहे.

चुकीच्या कारणासाठी चर्चेत असलेल्या केएल राहुलला आयपीएलमध्ये सूर गवसला. गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल हा बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहानला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता खुद्द सोनल चौहानने प्रतिक्रिया दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, एका कार्यक्रमात सोनलला केएल राहुलसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. 'केएल राहुल चांगला क्रिकेटपटू आहे. तो प्रतिभावान आहे, पण आमच्यामध्ये तसं काही नाही,' असं सोनल चौहान म्हणाली.

जन्नत-२ या चित्रपटात इमरान हाशमीसोबत काम केल्यानंतर सोनल चौहान चर्चेत आली. सध्या वेब सीरिज 'स्कायफायर'मध्ये दिसत आहे. २२ मेपासून Zee5 वर या वेब सीरिजच्या स्ट्रिमिंगला सुरुवात झाली आहे.

आकांक्षासोबतही जोडलं गेलं नाव

याआधी केएल राहुलचं नाव आकांक्षा रंजन कपूरसोबतही जोडलं गेलं होतं. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार आकांक्षा आणि राहुल यांनी बराच वेळ एकमेकांसोबत घालवला आहे. या दोघांना चित्रपट बघताना, घरातल्या पार्टीमध्ये आणि डिनरला जाताना पाहिलं गेलं आहे. आकांक्षा रंजन ही आलिया भट्टची मैत्रिण आहे. गायक अंकिता तिवारीच्या म्यूझिक व्हिडिओमध्ये आकांक्षा रंजन होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

...n i’m so good with that

A post shared by Kanch (@akansharanjankapoor) on

मागच्या वर्षी कॉफी विथ करण या शोमध्ये केएल राहुल आणि हार्दिक पांड्या सहभागी झाले होते. या कार्यक्रमात महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दोन्ही खेळाडू अडचणीत आले होते. या दोन्ही खेळाडूंचं बीसीसीआयने निलंबनही केलं होतं.