लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल भारत आणि बांगलादेश दरम्यान खेळली जात आहे. यात भुवनेश्वर कुमारने खूप चांगली गोलंदाजी केली.
एजबस्टन, बर्मिंघमच्या मैदानात भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बांगलादेश टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने धक्का दिला.
सामन्याची ओपनिंग टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमारने केली, बांगलादेशकडून ओपनर होतो, तमीम इकबाल आणि सौम्य सरकार.
पहला चेंडू भुवीने ऑफ स्टम्प केला, तमीमने मारण्याचा प्रयत्न केला नाही, पहिल्या चेंडूत एकही रन झाली नाही, दुसऱ्या चेंडूतही तमीमला शॉट मारता आला नाही, तिसरा चेंडू मि़डल स्टम्पला होता. तमीमने डिफेंड केलं आणि हा देखील डॉट बॉल राहिला.
चौथ्या चेंडूला तमीमे हलका शॉट खेळला आणि बांगलादेशला पहिला रन मिळाला. पाचव्या चेंडूवर सौम्य सरकार खेळला नाही, यानंतर भुवनेश्वर कुमारने आपल्या ओव्हरचा सहावा आणि शेवटचा चेंडू टाकला.
सौम्य सरकारने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटला हा बॉल लागला आणि चेंडूने स्टॅम्प्सचा वेध घेतला.भुवनेश्वर कुमारने १ रनच्या स्कोअरवर सौम्य सरकारला शून्यावर परत पाठवलं.