मुंबई : भारतामध्ये 'क्रिकेट' हा धर्म आणि क्रिकेटर हा देवासमान मानला जातो.
चाहत्यांचं हे प्रेम उत्साह वाढवणारं असलं तरीही अनेकदा यामुळे अनेक क्रिकेटर्सना सार्वजनिक ठिकाणी खुलेआम जाणं कठीण होऊन बसतं.
सौरव गांगुली हा भारताचा माजी कर्णधार होता. कोलकत्त्यामध्ये त्याचे हजारो चाहते आहेत. एकदा सौरव गांगुलीने दुर्गापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी वेषांतर केल्याचा उल्लेख 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या पुस्तकामध्ये केला आहे. सौरव गांगुलीला या वेषांतरासाठी त्याच्या पत्नीने मदत केली होती.
कोलकत्त्यामध्ये 'दुर्गापूजा' हा सोहळा मोठा असतो. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सौरव गांगुलीला 'सरदारजी'चा वेष घ्यावा लागला होता. बंगालमध्ये 'विसर्जन' करण्याचा सोहळा असतो. यामध्ये सहभागी होताना सौरवने 'सरदारजी'चा वेष घेतला होता.
सौरव गांगुलीने या किस्स्याबाबत खुलासा करताना म्हणाला, " 'विसर्जन' सोहळ्यात सहभागी होण्यासाठी माझ्या भावडांनी मला चॅलेन्ज देण्यात आले होते. मात्र खुलेपणे जाणं शक्य नव्हतं.. तेव्हा वेषांतराचा निर्णय घेतला आणि माझी मेहनत कामाला आली. पोलिसांनीही गाडी थांबवली होती. त्यावेळेस माझ्याकडे त्यांनी निरखून पाहिलं. त्यांना मी इशारा केल्यानंतर ही गोष्ट लपवून ठेवायला मदत झाली.