Sourav Ganguly गंभीर आजाराने त्रस्त, जाणून घ्या 'त्या' आजाराबद्दल

दादाची प्रकृती स्थिर आहे.  

Updated: Jan 30, 2021, 01:48 PM IST
Sourav Ganguly गंभीर आजाराने त्रस्त, जाणून घ्या 'त्या' आजाराबद्दल  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार दादा ‘ट्रिपल वेसल डिजीज’ (Triple Vessels Disease) या आजाराने त्रस्त आहे. ‘ट्रिपल वेसल डिजीज’ हा आजार नक्की कसा आहे. त्याने शरीरिरावर काय परिणाम होतात. आजार किती गंभीर आहे, हे आज आपण जाणून घेवू. दरम्यान, 26 जानेवारी 2021 ला सौरव गांगुलीला छातीत दुखायला लागलं. त्यामुळे त्याला कोलकाताच्या अपोलो रुगणालायात दाखल करण्यात आलं. 

त्यानंतर दादाची एंजिओप्लास्टी केली गेली आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी आणखी 2 स्टेंट करण्यात आल्या. आता दादाची प्रकृती स्थिर आहे. एंजिओप्लास्टी म्हणजे ह्रदयाची सर्जरी. ज्याला बलून एंजियोप्लास्टी आणि परक्यूटेनियस ट्रांसल्यूमिनाल एंजियोप्लास्टी म्हणून देखील संबोधलं जातं. 

माणसाच्या शरीरात धमन्या महत्त्वाचं अंग आहे. धमन्या संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करतात. बर्‍याच वेळा रक्तामध्ये कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे चरबी जमा होण्यास सुरवात होते आणि धमनीला अडथळा निर्माण होतो. याला ‘कोरोनरी आर्टरी डिजीज’ (Coronary Artery Disease) असं म्हणतात.

‘कोरोनरी आर्टरी डिजीज’मुळे ह्रदयविकाराचा धक्का देखील येण्याची शक्यता असते. मेडीकल तज्ज्ञांच्या मते ‘कोरोनरी आर्टरी डिजीज’ एक गंभीर आजार आहे.  जेव्हा तीन धमन्या ब्लॉक होतात त्याला ‘ट्रिपल वेसेल डिजीज’ नावाने ओळखलं जातं. ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, छातीत देखील दुखतं. परिणामी ह्रदयविकाराचा धक्का येतो.