मुंबई: हर्शल गिब्स आपल्या करियरमध्ये अनेक मोठ्या वादविवादांमध्ये सापडलेला क्रिकेटपटू होता. 2001मध्ये हर्शल गिब्स एन्टीगा इथल्या जॉली रिसॉर्टवरील एका रुममध्ये गांजा ओढताना पकडला गेला होता. साऊथ अफ्रिकेच्या या स्टार फलंदाजावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. मात्र या गांजा प्रकरणामुळे त्याच्या नावाची चर्चा वाईट चर्चा झाली होती.
2001मध्ये दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार शॉन पोलॉकच्या नेतृत्वात टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. वन डे आणि कसोटी सामन्या दरम्यान 11 मे रोजी रात्री उशिरा हर्शल गिब्स आपल्या रिसॉर्टच्या रूममध्ये गांजा ओढताना पकडला गेला. त्याच्यासोबत रोजर टेलेमाकस, पॉल एडम्स, जस्टिन कॅम्प आणि आन्द्रे नेल त्या रूममध्ये उपस्थित होते. इतकच नाही तर त्यांच्यासोबत दक्षिण अफ्रिकेचे कोच देखील त्याच खोलीत गांजा ओढताना उपस्थित होते.
दक्षिण अफ्रिकेच्या संघाचे तत्कालीन फिजिओ क्रेग स्मिथसुद्धा या सगळ्यात प्रसंगादरम्यान उपस्थित होते. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डनं हर्शल गिब्ससह संघातील सर्व सदस्यांवर कडक कारवाई केली आणि 10 हजाराचा दंड ठोठावला आहे. हर्शल गिब्सही फिक्सिंगच्या जाळ्यात अडकला. सन 2000 मध्ये, हर्शल गिब्सला 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं.
हर्शल गिब्सेन त्यानंतर 12 मार्च 2006मध्ये दारूच्या नशेत 175 धावा केल्या होत्या. 111 चेंडूमध्ये 175 धावांची खेळी केली होती. गिब्स बद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर माइक हसीने आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. हर्शलचं करियर 15 वर्ष टिकलं तो एकमेव फलंदाज आहे ज्याने वन डे सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकले होते.