क्या बात! 'वडापाव' खाण्यासाठी सचिनच्या घरी कोण आलंय पाहिलं का?

या वेळी त्याला साथ मिळाली 'या' खास पाहुण्याची...   

Updated: Sep 7, 2020, 03:02 PM IST
क्या बात! 'वडापाव' खाण्यासाठी सचिनच्या घरी कोण आलंय पाहिलं का?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मुंबईकरांच्या धकाधकीच्या आयुष्याला मार्च महिन्यापासून खऱ्या अर्थानं ब्रेक लागला होता. घड्याळाच्या काट्यावर धावणारं हे शहर अनपेक्षिरित्या एकाएकी शांत झालं होतं. सर्व व्यवहार ठप्प, असंच चित्रं पाहायला मिळत होतं. या ठप्प व्यवहारांमध्ये कला, क्रीडा अगदी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची कामंही ठप्प झाली होती. तेव्हापासून ते आता मुंबईत अनलॉक प्रक्रिया सुरु होण्याच्या क्षणापर्यंत सर्वांना एका गोष्टीही प्रचंड आठवण आली. ती गोष्ट, किंबहुना तो पदार्थ म्हणजे 'वडापाव'. 

मुंबईकर आणि वडापाव हे भलतंच समीकरण. म्हणजे शब्दांतही न मांडता येणारं नातं. क्रिकेटर सचिन तेंडुलकर यालाही हे पटतं. मुळात खुद्द सचिनचाही हा आवडीचा पदार्थ. तेव्हा कोणाला वडापाव मिळो वा नं मिळो, सचिनने मात्र तो खाण्याची व्यवस्था केलीटच. हा मुंबईकर मास्टर ब्लास्टर सध्याच्या काळात त्याच्या घरीच वडापावचा आनंद लुटताना पाहायला मिळाला. ज्यामध्ये त्याला साथ मिळाली एका खास पाहुण्याची. 

सोशल मीडियावर त्यानं या खवय्येगिरीच्या क्षणांचा फोटो पोस्ट करत, सोबतच हा पाहुणा आहे तरी कोण याचीही झलक दाखवून दिली. या फोटोमध्ये सचिन प्लेटमध्ये असणाऱ्या वडापावला चटणी लावताना दिसत आहे. त्याची ही कृती सुरु असताना घरात आलेल्या पाहुणे मंडळीचीही त्याच्यावर बारीक नजर. 

 

'वडापाव हा माझ्या आवडीचा पदार्थ होता, आहे आणि कायम राहील. हो आणि, एक अनपेक्षित पाहुणाही यापैकी एकाची चव चाखण्यासाठी उत्सुक दिसला.....', असं म्हणत या पाहुण्याचा फोटोही त्यानं पोस्ट केला. हा फोटो पाहिल्यास एका दाराच्या आडून मांजर / बोका बारीक नजरेनं सचिनकडे पाहताना दिसत आहे. आहे की नाही, हा पाहुणा खास? मास्टर ब्लास्टरसाठी तरी तो खास आहे हे मात्र खरं.