IND vs SL ODI : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा प्रमुख खेळाडू संघाबाहेर

IND vs SL ODI : टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे

Updated: Jan 9, 2023, 05:04 PM IST
IND vs SL ODI : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा प्रमुख खेळाडू संघाबाहेर title=

India vs Sri Lanka ODI Series : टी20 मालिका जिंकल्यानंतर आता भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ( IND vs SL ODI Series ) खेळवली जाणार आहे.  10 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहचा भारतीय एकदिवसीय संघात अचानक समावेश करण्यात आला होता. पण आता पुन्हा त्याला टीमबाहेर करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बुमराह इतर खेळाडूंबरोबर गुवाहाटीला पोहोचलेला नाही. गुवाहाटीत 10 जानेवारीला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. लंकेविरुद्ध बीसीसीआयने एकदिवसीय संघ जाहीर केला तेव्हा बुमराहचा समावेश करण्यात आला नव्हता. पण 3 जानेवारीला बुमराहचा अचानक संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे जसप्रीत बुमराह आता पूर्णपणे फिट असून खेळण्यास सज्ज असल्याचं चाहत्यांना वाटलं.

यंदाचं वर्ष हे एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपचं वर्ष आहे. त्यामुळे बीसीसीआय कोणताही धोका पत्करुन इच्छित नाही. त्यामुळेच बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला दुखापतीतून पूर्णपणे बरं होण्याचा वेळ दिला जाणार आहे. 

दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर
सप्टेंबर 2022 पासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे क्रिकेटापसून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत बुमराह शेवटचा खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला टीम बाहेर जावं लागलं. दुखापतीमुळे त्याला गेल्या वर्षी एशिया कप आणि टी20 वर्ल्ड कपही खेळता आला नाही. 

एकदिवीस मालिकेसाठी भारतीय संघ ( India Squad )
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

एकदिवीस मालिकेसाठी श्रीलंका संघ ( Sri Lanka Squad )
दासुन शनाका (कर्णधार), नुवानिडु फर्नांडो, आविष्का फर्नांडो, अशेन बंडारा, पथुम निसंका, धनंजय डिसिल्वा, चरित असलंका, चामिका करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन, डुनिथ वेलालेज, जेफरी वेंडरसे, कासुन राजिथा, लाहिरू कुमारा और महीष तीक्ष्णा.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक ( IND vs SL ODI Schedule )

  • 10 जानेवरी- पहिला एकदिवसीय सामना,  गुवाहाटी, दुपारी 1.30 वाजता
  • 12 जानेवरी- दूसरा एकदिवसीय सामना, कोलकाता, दुपारी 1.30 वाजता
  • 15 जानेवरी- तीसरा एकदिवसीय सामना, तिरुवनंतपुरम, दुपारी 1.30 वाजता