close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विराटचा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, 'पण भावा... तुझी टीम मैदानात बोंब पाडेल का?

यापूर्वी ६ पराभव झाल्याने विराटची टीम पराभवाची मालिका खेळत असल्यासारखी खेळतेय, अशी टीका होत आहे. पण या सामन्या आधी एका

Updated: Apr 12, 2019, 10:34 PM IST
विराटचा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, 'पण भावा... तुझी टीम मैदानात बोंब पाडेल का?

मुंबई : विराट कोहलीच्या टीमचा सतत पराभव होतोय.  रॉयल चैलेंजर्स बेंगळूरु (RCB) शनिवारी किंग्स इलेवन पंजाब (KXIP) सोबत खेळणार आहे. यापूर्वी ६ पराभव झाल्याने विराटची टीम पराभवाची मालिका खेळत असल्यासारखी खेळतेय, अशी टीका होत आहे. पण या सामन्या आधी एका जाहिरातीत, विराट कोहली हा मस्ती करताना दिसून आला आहे. बंगळुरूचा कप्तान विराट कोहलीला त्याचे चाहत्या चांगलंच सुनावतायत.

कोहलीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या नव्या जाहिरातीचा एक फोटो शेअर केला आहे, फोटोखाली लिहिलंय, उर्जेत नेहमी पुढे राहा, यावरून विराट कोहलीला त्याच्या चाहत्यांनी चांगलंच घेरलंय.

एका चाहत्याने लिहिलंय, 'भाऊ, थोडं आयपीएलवर पण फोकरस कर...'

दुसऱ्या चाहत्याने लिहिलंय, 'एक मॅच जिंकता येत नाही, आणि भाऊला सर्व जाहिराती करायच्या आहेत'.

एकाने तर फारंच घेरलंय, तो म्हणतोय, 'आरसीबी कधी जिंकणार आहे?, आता तर आमच्याकडून ट्रोल्स होत नाहीत'.

'मॅच जिंकून दे भावा, मित्रांमध्ये नाक नको कापूस', असं चाहत्याने त्याला हात जोडून सांगितल्यासारखं लिहिलंय.

आऱसीबीला हा सिझन एवढा अनुकूल नव्हता, मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हरवलं, तो सहावा पराभव होता, आता आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान ८ सामने जिंकावे लागणार आहेत.