मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी टी२० विश्वचषक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. पण, अखेरच्या टप्प्यावर मात्र संघाच्या वाट्याला अपयश आलं. याच अपयशाचा सामना करत पुन्हा एकदा या महिला खेळाडू त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि या खेळावर लक्ष केंद्रित करु लागल्या आहेत. अशाच या खेळाडूंच्या विश्वचषकातील कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यापैकीच एका खेळाडूवर भारतीय वायुदलाकडून शाबासकीची थाप देण्यात आली आहे.
क्रिकेट संघ, क्रीडारसिक आणि विविध स्तरांती मान्यवरांसोबतच वायुदलाकडून कौतुक होणारी ही खेळाडू म्हणजे शिखा पांडे. वायुदलाच्या सोशल मीडिया पेजवरुन शिखाचा फोटो पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये मार्शल एम.एस.जी. मेनन हे वायुदलाच्या वतीने तिचं कौतुक करताना दिसत आहेत. वायुदलाकडून शिखाचं कौतुक केल्यानंतर क्रीडारसिकांनीही तिला शाबासकी देण्यास सुरुवात केली.
'या' मंदिरात दिला जातो मटण बिर्याणीचा प्रसाद
अशी होती टी२० विश्वचषकातील भारतीय महिला संघाची कामगिरी
यंदाच्या टी२० विश्वचषकामध्ये भारतीय महिलांनी दमदार कामगिरीच्या बळावर सर्व साखळी सामने जिंकले होते. पहिल्याच सामन्यात संघाकडून यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारतीय महिला खेळाडूंनी नमवलं. न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांग्लादेश या संघांवरही भारतीय संघाने मात केली होती. पण, अखेरच्या टप्प्यात मात्र संघाची कामगिरी खालावली आणि विश्वचषक जेतेपदाचं स्वप्न भंगलं.