नवी दिल्ली : श्रीलंका टीम याबाबतीत नेहमीच स्पेशल टीम राहिली आहे. या टीमने नेहमीच अनआर्थोडॉक्स स्पिनर मैदानात उतरवले आहेत. आता पुन्हा एकदा श्रीलंका क्रिकेट टीममध्ये एका नव्या खळबळ उडवून देणा-या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. १८ वर्षीय लेग स्पिनर केविन कोथिगोडा असं त्याचं नाव आहे. केविन सध्या मलेशियामध्ये अंडर १९ टीमचा भाग आहे. तो सध्या युवा एशिया कप खेळत आहे. या आठवड्यात श्रीलंकाने अफगाणिस्तान विरूद्ध ६१ रन्सचा महत्वपूर्ण विजय केविनच्या मदतीने मिळवला.
केविनच्या गोलंदाजीची अॅक्शन दक्षिण आफिक्रेच्या पॉल अॅडम्ससारखीच आहे. माजी गोलंदाज पॉल डाव्या हाताचा चायनामॅन गोलंदाज होता. केविन ह उजव्या हाताने तशीच गोलंदाजी करतो. अफगाणिस्तान विरूद्ध मिळवलेल्या विजयात केविनने एक विकेट घेतली होती. श्रीलंका ए टीमचा माजी ओपनर धमिका सुदर्शनने रिचमोंड कॉलेजमध्ये केविनला तयार केलंय.
#YouthAsiaCup2017 | Kevin Koththigoda of Mahinda College, Galle who made his Sri Lanka U19s debut today was first spotted last year by @ThePapareSports for his uncharacteristic bowling action during the Murali Harmony Cup in Jaffna! @PaulAdams39 @OfficialSLC @MahelaJay pic.twitter.com/auLDFlvtrS
— Damith Weerasinghe (@Damith1994) November 11, 2017
दरम्यान, १९९५ मध्ये इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हंसी क्रोनिएने १८ वर्षीय पॉल अॅडम्सला पोर्ट ऑफ एलिझाबेथमध्ये उतरवलं होतं. अॅडम्सने इथे ८ विकेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच्या भरोशावरच दक्षिण आफ्रिकेने सीरिज जिंकली होती. श्रीलंकेला आशा आहे की, केविन कोथिगोडा सुद्धा श्रीलंकेचं प्रतिनिधीत्व करेल आणि देशासाठी सामने जिंकेल.