विराटच्या या नव्या प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर त्याचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. तसं तर प्रोफाइल फोटो बदलने ही मोठी गोष्ट नसते पण विराटच्या या प्रोफाइल फोटोची आता चर्चा रंगणार हे मात्र खरंय.

Updated: Nov 13, 2017, 12:19 PM IST
विराटच्या या नव्या प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर त्याचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. तसं तर प्रोफाइल फोटो बदलने ही मोठी गोष्ट नसते पण विराटच्या या प्रोफाइल फोटोची आता चर्चा रंगणार हे मात्र खरंय.

प्रोफाइल फोटोमध्ये तो त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत दिसत आहे. विराट तसं या गोष्टीवर बोलणं आणि प्रतिक्रिया देणं तसं टाळत होता पण आता त्याच्या या फोटोने त्याने अनुष्का सोबतचं नातं जाहीररित्या स्विकारलं आहे असं म्हणता येईल.

विराट लवकरच अनुष्का सोबत लग्न करणार आहे ही चर्चा आता खरी ठरतांना दिसत आहे. कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा हातात हात घेऊन उभे आहेत. इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स अवॉर्ड्स दरम्यानचा हो फोटो आहे.

रेड कारपेटवर ही जोडी येताच अनेकांच्या भूवया उंचावल्या. अनुष्‍का आणि विराटची ही जोडी रेड कारपेटवर अनेकांनी पसंत केली. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.