Josh Hazlewood Video: सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमचं वर्चस्व दिसून आलं. दरम्यान या सामन्यात अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे चाहते हैराण झाले आहेत. गाबामध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा सामना सुरु आहे. यावेळी विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना गोलंदाजाने कॅमरून ग्रीनला दूर लोटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यामध्ये ट्रेविस हेड आणि कॅमरून ग्रीनचा समावेश होता. यावेळी टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विकेटचा आनंद साजरा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने कॅमेरून ग्रीनला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दूर ढकललं.
Hazlewood shoos away the Covid-positive Green! #AUSvWI pic.twitter.com/iQFbbKfpwV
— cricket.com.au (@cricketcomau) January 25, 2024
ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन आणि कोच अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह झाली होती. असं असूनही ट्रॅव्हिस हेड ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळण्यासाठी वेळेत बरा झाला. यानंतर तर मॅकडोनाल्ड आणि ग्रीन यांना टीमपासून सुरक्षित अंतर राखावं लागलं. दरम्यान ग्रीन कोरोना पॉझिटिव्ह असूनही ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्याने सर्वांना आश्चर्य झालं.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटने खेळाडूंना कोरोनाचे प्रोटोकॉल लक्षात ठेऊन आणि काही सावधगिरी बाळगून सामने खेळण्याची परवानगी दिलीये. राष्ट्रगीताच्या वेळी त्याच्या सहकाऱ्यांपासून दूर उभे राहून ग्रीनने या काळात देखील संयम दाखवला. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी विंडीजची विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशनच्या वेळी ही अनोखी घटना घडली.
जोश हेझलवूडने कॅमेरून ग्रीनला आनंदाच्या वातावरणात देखील अंतर राखण्याची आठवण करून दिली. दरम्यान यापूर्वी स्टीव्ह स्मिथने सामन्याच्या पूर्वी ग्रीनची तब्येत चांगली असल्याचं म्हटलं होतं.