Sunil Gavaskar : टीम इंडिया ( Team India ) सध्या एशिया कपसाठी श्रीलंकेत आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची यो-यो टेस्ट करण्यात आली होती. यावरून मोठा वादंग देखील माजला होता. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने ( Virat Kohli ) यो-यो टेस्टचा ( Yo-Yo test ) स्कोर सोशल मीडियावर शेअर केल्याने बीसीसीआयकडून ( BCCI ) त्याची चांगलीच कानउघडणी करण्यात आली होती. टीम इंडियाकडून यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) होता. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी मोठं विधान केलं आहे.
सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांच्या म्हणण्यानुसार, यो-यो टेस्टचा स्कोर सार्वजनिक करण्यात येणं ही बीसीसीआयसाठी सर्वात वाईट कल्पना असू शकत नाही .क्रिकेट चाहत्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, टीममध्ये असा एकही खेळाडू नाही जो फिटनेसच्या निकषांमध्ये बसत नाही.
गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांच्या म्हणण्यानुसार, यो-यो टेस्टचा स्कोअर सर्वसामान्यांना हे दर्शवेल की टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या विशिष्ट खेळाडूची टीममध्ये निवड झाली आहे की नाही. गावस्कर यांनी एक वृत्तपत्रामध्ये कॉलम लिहीला असून तो भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीचा आहे.
यामध्ये विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या यो यो चाचणीच्या निकालाबाबत गावस्करांनी ( Sunil Gavaskar ) म्हटलंय की, दोघांच्या वयातील फरक लक्षात घेता विराट कोहलीचे कौतुक करायला हवं. यो-यो चाचणीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंनी खूप चांगली फलंदाजी करत रन्स केले आणि विकेट घेतल्या, तर सर्वांना कळेल की, क्रिकेट खेळण्याची क्षमता फीटनेस टेस्टपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.
सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) पुढे लिहीतात की, ज्यावेळी कोहलीने त्याचा यो यो स्कोअर शेअर केला तेव्हा खूप उत्सुकता होती, जी बीसीसीआयच्या प्रशिक्षकांनी ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होती. युवा शुभमन गिलचा स्कोरही चांगला होती. मात्र दोघांमधील वयातील फरक विसरता कामा नये. यावेळी कोहलीच्या फीटनेससाठी त्याचं कौतुक केलं गेलं पाहिजे.
सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने कोणीही यो-यो टेस्टचा स्कोर पोस्ट करू नये, असे निर्देश दिलेत. मात्र काही खेळाडूंना लाज वाटू नये यासाठी हा निर्णय तयार करण्यात आलाय का? कोणाला पाठीशी घातलं जातंय? यो-यो टेस्टच्या किमान मानकांची पूर्तता केल्याशिवाय खेळाडू निवडीसाठी पात्र नाही हे खरे असेल, तर सर्वांचा स्कोर सार्वजनिक डोमेनमध्ये आला पाहिजे आणि हे देखील महत्त्वाचे आहे.