सुनिल नारायणचं दणदणीत अर्धशतक, कोलकात्यानं बंगळुरूला हरवलं

सुनिल नारायणच्या दणदणीत अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ विकेटनं पराभव केला आहे.

Updated: Apr 8, 2018, 11:46 PM IST
सुनिल नारायणचं दणदणीत अर्धशतक, कोलकात्यानं बंगळुरूला हरवलं  title=

कोलकाता : सुनिल नारायणच्या दणदणीत अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सनं विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ विकेटनं पराभव केला आहे. १७७ रन्सचा पाठलाग करताना केकेआरनं १८.५ ओव्हरमध्ये ६ विकेट गमावल्या.

सुनिल नारायणनं १९ बॉलमध्ये ५० रन्सची खेळी केली. नारायणनं ५ फोर आणि ४ सिक्स लगावल्या. नितीश राणानं २५ बॉलमध्ये ३४ आणि दिनेश कार्तिकनं २९ बॉलमध्ये नाबाद ३५ रन्स केल्या. बंगळुरूच्या क्रिस वोक्सनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. उमेश यादवला २ आणि वॉशिंग्टन सुंदरला एक विकेट घेण्यात यश आलं.

त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या. बंगळुरूकडून मॅक्कलम, विराट आणि एबी डिव्हिलयर्सला चांगली सुरुवात मिळाली पण त्यांना मोठा स्कोअर करता आला नाही. मॅक्कलमनं २७ बॉलमध्ये ४३, विराटनं ३३ बॉल्समध्ये ३१ आणि एबीनं २३ बॉल्समध्ये ४४ रन्स केल्या. तर मनदीप सिंगनं १८ बॉलमध्ये ३७ रन्स केल्या.

कोलकात्याच्या विनय कुमार आणि नितीश राणाला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. नितीश राणानं विराट कोहली आणि एबी डिव्हिलयर्सला आऊट केलं. तर पियुष चावला, सुनिल नारायण आणि मिचेल जॉनसनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.