हैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर

चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी हैदराबादच्या टीमला मोठा झटका बसला आहे. 

Updated: Apr 22, 2018, 06:07 PM IST
हैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर title=

हैदराबाद : चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी हैदराबादच्या टीमला मोठा झटका बसला आहे. हैदराबादचा ओपनर शिखर धवन या मॅचमध्ये खेळू शकला नाही. दुखापत झाल्यामुळे धवनला या मॅचला मुकावं लागलं आहे. मागच्या मॅचमध्ये धवनच्या हाताला लागलं होतं. आयपीएलच्या लागोपाठ ७३ मॅच खेळल्यानंतर ७४व्या मॅचमध्ये शिखर धवन मैदानात उतरला नाही. याआधी २०१३मध्ये धवन लागोपाठ ७ मॅच खेळू शकला नाही.

मागच्या गुरुवारी मोहालीमध्ये पंजाबविरुद्ध खेळत असताना शिखर धवनला दुखापत झाली. पहिले बॅटिंगला उतरलेल्या पंजाबनं १९३ रन केल्या, यामध्ये गेलच्या शतकाचा समावेश होता. यानंतर १९४ रनचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादची टीम मैदानात उतरली. या मॅचमध्ये शिखर धवन ओपनिंगला आला. पण पहिल्याच ओव्हरमध्ये धवनला दुखापत झाली. पंजाबच्या बरिंदर सरनच्या बॉलिंगवर धवनच्या हाताला बॉल लागला. यानंतर धवन ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि पुन्हा बॅटिंगलाच उतरला नाही.