कोलंबो : श्रीलंका क्रिकेट बोर्डने सहा मार्चपासून सुरू होत असलेल्या टी-२० ट्राय सीरिज निडास ट्रॉफीसाठी टीमची घोषणा केली आहे.
भारत दौ-या आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलची श्रीलंका टीममध्ये वापसी झाली आहे. लकमल आणि नुवान प्रदीप यांनी श्रीलंकेच्या टी-२० टीममध्ये वापसी केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डने सहा मार्चपासून सुरू होत असलेल्या टी-२० ट्राय सीरिज निडास ट्रॉफीसाठी टीमची घोषणा केली आहे.
या सीरिजसाठी विकेटकीपर-फलंदाज निरोशन डिकवेला याला बाहेर ठेवण्यात आलं आहे. कारण टीममध्ये धनंजय डी सिल्वा याला संधी देण्यात आली आहे. यासोबतच बांग्लादेश विरूद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सीरिजमध्ये सामिल जैफरे वांडर्से याला सुद्धा निडास ट्रॉफीसाठी टीममधून बाहेर ठेवण्यात आलंय. या ट्रॉफीसाठी टीममध्ये दोन स्पिन गोलंदाज अकीला धनंजय आणि अमीला अपोंसो यांनी संधी देण्यात आलीये.
टीमचे अनुभवी खेळाडू एंजेलो मॅथ्यूज, असेला गुणारत्ने आणि शनान मधुशंका हे अनफिट असल्याने ते सीरिजमध्ये खेळणार नाहीयेत. गेल्या दौ-या जेव्हा श्रीलंकाई टीम भारतात आली होती, तेव्हा कोलकातामध्ये पहिल्या टेस्टमध्ये सुरंगा लकमलच्या गोलंदाजीने टीम इंडियाच्या नाकी नऊ आणले होते. पण सीरिज गमावली होती.
श्रीलंका टीम : दिनेश चंडीमल (कर्णधार), उपुल थारंगा, दनुश्का गुनाथीलका, कुस्ल मेंडिस, दासुन शनाका, कुसल परेरा, थिसारा परेरा, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, इसुरू उदाना, अकीला धनंजय, अमीला अपोंसो, नुवान प्रदीप, दुश्मंथा चमीरा आणि धनंजय डी सिल्वा.