Surya Kumar Yadav: सुर्यकुमार यादव 'विक्रमाधीश'! 2022 वर्षात 'या' रेकॉर्डसवर कोरलं नाव

Surya Kumar Yadav Batting Records in 2022 : 2022 या वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुर्याची (Surya Kumar Yadav Records)  बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका असो किंवा टी-20 विश्वचषक, सूर्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. 

Updated: Dec 15, 2022, 07:10 PM IST
Surya Kumar Yadav: सुर्यकुमार यादव 'विक्रमाधीश'! 2022 वर्षात 'या' रेकॉर्डसवर कोरलं नाव  title=

Surya Kumar Yadav Batting Records in 2022 : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सुर्यकुमार यादवसाठी (Surya Kumar Yadav) 2022 हे वर्ष खुप चांगले गेले आहे. या वर्षात त्याची बॅट चांगलीच तळपली आहे.त्याने या वर्षात बॅटीने अनेक मोठे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्याचे हे आकडे पाहुन अनेकांनी तोंडात बोट घातलीय. दरम्यान या वर्षात त्याने नेमके कोणते एका पेक्षा एक मोठे रेकॉर्ड केले आहेत, हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा: Team India ला हरवल्यानंतर दुकानदाराने फुकट वस्तु दिल्या,पाकिस्तान खेळाडूने सांगितला 'तो' किस्सा

2022 या वर्षात T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुर्याची (Surya Kumar Yadav Records)  बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका असो किंवा टी-20 विश्वचषक, सूर्याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. अशा परिस्थितीत आज आम्ही अशाच 5 विक्रमांबद्दल सांगणार आहोत जे सुर्यकुमारने यावर्षी केले आहेत.

हे ही वाचा : उमेश यादवची बुलेटच्या वेगाने गोलंदाजी, हवेत इतका उंच उडाला स्टंप, पाहा VIDEO

टी20 हजार धावा

सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) 2022 या वर्षात 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवची सरासरी 46.56 आहे, तर स्ट्राइक रेट 187.43 आहे. याशिवाय सूर्यकुमारने (Surya Kumar Yadav Records)  यावर्षी 2 शतकांव्यतिरिक्त 9 वेळा हाफ सेंच्यूरी केली आहे. दरम्यान एका वर्षात टी-20 फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा सूर्यकुमार भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरलाय.  

 

दोन तुफानी सेंच्यूरी 

सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) यावर्षी एक नव्हे तर दोन शतके झळकावली आहेत. इंग्लंड दौऱ्यावर टी-20 मालिकेत त्याने पहिले शतक झळकावले. त्या सामन्यात त्याने 117 धावांची खेळी केली होती. त्याचवेळी त्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसरे शतक झळकावले. या सामन्यात त्याने 111 धावा केल्या. या दोन शतकांसह त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) विक्रमाची बरोबरी साधली. खरंतर, रोहितने 2018 साली दोन टी-20 शतके झळकावली होती.

न्यूझीलंडविरुद्ध सेंच्यूरी मारणारा पहिला भारतीय

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावण्याचा खास विक्रम सुर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) केला आहे. विशेष म्हणजे त्याच्याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला न्यूझीलंडविरुद्ध टी20 फॉर्मेटमध्ये शतक झळकावता आले नव्हते. या सामन्यात त्याने 111 धावांची खेळी केली होती.

सात वेळा सामनावीराचा किताब

2022 या वर्षात सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) 7 वेळा सामनावीराचा किताब पटकावला. यामध्ये सूर्याने विराट कोहलीला मागे टाकले. यापूर्वी 2016 मध्ये विराट कोहलीने 6 वेळा सामनावीराचा किताब पटकावला होता.

सर्वाधिक सिक्स 

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रमही सूर्यकुमार यादवच्या (Surya Kumar Yadav Records) नावावर आहे. त्याने या वर्षात 68 सिक्स मारले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानचा मोहम्मद वसीम या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 43 षटकार ठोकले आहेत.

दरम्यान सुर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav Records)  वरील सर्व रेकॉर्ड 2022 या कॅलेंडर वर्षात केले आहेत. आता पुढच्या 2023 या वर्षात देखील त्याने अशीच कामगिरी करावी,अशी अपेक्षा क्रिकेट फॅन्सची आहे.