IPL 2024 : मुंबई इंडियन्सला जोर का झटका! रोहित शर्माचा हुकमी एक्का 'या' आजाराने त्रस्त

IPL 2024, Mumbai Indians : सूर्यकुमार यादव याला स्पोर्ट्स हार्निया झाल्याची माहिती समोर आलीये. सध्या सूर्या (Suryakumar yadav) बंगळुरूमधल्या एनसीएमध्ये असून लवकरच तो जर्मनीमध्ये उपचारासाठी जाणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 8, 2024, 03:06 PM IST
IPL 2024 : मुंबई इंडियन्सला जोर का झटका! रोहित शर्माचा हुकमी एक्का 'या' आजाराने त्रस्त title=
Mumbai Indians, Suryakumar yadav, IPL 2024

Suryakumar Yadav Surgery : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेत टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. या मालिकेचं नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे जाईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, रोहितला जबाबदारी देण्यात आली असून सूर्याला संघात स्थान देखील मिळालं नाही. त्यामुळे अनेकांना चिंता लागून राहिली होती. अशातच आता सूर्याला संधी का मिळाली नाही? याचं उत्तर आता समोर आलं आहे. सूर्यकुमार यादव एका आजाराने त्रस्त असून लवकरत तो परदेशात जाऊन उपचार घेणार आहे. त्यामुळे सूर्या आगामी आयपीएल (IPL 2024) तसेच त्यानंतर खेळवला जाणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) टेन्शन देखील वाढलंय. 

सूर्यकुमार यादव याला स्पोर्ट्स हार्निया झाल्याची माहिती समोर आलीये. सध्या सूर्या बंगळुरूमधल्या एनसीएमध्ये असून लवकरच तो जर्मनीमध्ये उपचारासाठी जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तो ऑपरेशनसाठी जर्मनीतील म्युनिकला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे. त्यानंतर मात्र तो विश्रांती घेण्याची शक्यता आहे. अशातच आता सूर्याच्या या दुखापतीमुळे तो यंदाची आयपीएल सामने देखील मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. 2022 मध्ये केएल राहुलला देखील हा आजार झाला होता. त्यानंतर तो काही महिने संघाबाहेर होता. 

स्पोटर्स हार्निया म्हणजे काय?

स्पोर्ट्स हर्नियाला ऍथलेटिक पबल्जिया, स्पोर्ट्समॅन्स हर्निया आणि गिलमोर ग्रोइन असे देखील म्हणतात. यामध्ये दुखापतीमुळे मज्जातंतूचा त्रास होऊ शकतो. त्या भागात वेदना आणि संवेदनशीलता देखील वाढतो. अचानक पळण्याची दिशा बदलणे किंवा वेगाने वळणे यामुळे स्पोर्ट्स हर्निया होण्याची शक्यता असते. ऍथलेटिक पबल्जिया असा त्याचा खरा शब्द: उच्चार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड , विष्णू विनोद.

नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.