मुंबई : टीम इंडियाला (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (T 20 World Cup 2022 Semi Final) पोहचवण्यसाठी मदत करतेय, असा गंभीर आरोप पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) आयसीसीवर (Icc) केला. यानंतर बीसीसीआय अध्यक्ष (Bcci President) रॉजर बिनी (Roger Binny) यांनी आफ्रिदीच्या आरोपांना उत्तर देत चांगलंच सुनावलंय. बिनी जे काय बोलले ते आफ्रिदी आयुष्यभर विसरु शकणार नाही. (t 20 world cup 2022 bcci chief roger binny give answerd to pakistan former captain shahid afridi on his blame on icc)
"आयसीसीकडून टीम इंडियाला मदत करण्याचा आरोप योग्य नाही. आयसीसीच्या सर्व सदस्य देशांना समान वागणूक दिली जाते. आम्हाला इतर संघाच्या तुलनेत काही वेगळ मिळत नाही. भारताचा क्रिकेट विश्वात दबदबा आहे. पण आयसीसी इतर संघासारखंच भारतासोबत व्यवहार करतं", असं बिनी म्हणाले.
"आयसीसीला टीम इंडियाला कुठल्याही परिस्थितीत टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहचवायचं आहे. आयसीसीने मैदान ओलं असूनही बांगलादेश विरुद्ध सामना आयोजित केला", असंही आफ्रिदी म्हणाला होता.
टीम इंडियाने बांगलादेशचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये डकवर्थ लुईस नियमांनुसार 5 धावांनी शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे काही षटकांचा खेळ वाया गेला. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी नवं आव्हान देण्यात आलं. डकवर्थ लुईस नियमांनुसार तेव्हा बांगलादेश 17 धावांनी आघाडीवर होती. मात्र पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाने शानदार कामगिरी करत बांगलादेशचा सुपडा साफ केलाच. यावरुन या वादाला तोडं फुटलं.