मुंबई : पाकिस्तानला पराभूत करत इंग्लंड (England) दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरली. आता पुढील टी 20 वर्ल्ड कप हा 2024 मध्ये (T20 World Cup 2024) खेळवण्यात येणार आहे. विंडिज आणि यूएसएला संयुक्तरित्या या वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान देण्यात आला आहे. विंडिजने 2022 च्या वर्ल्ड कपसाठी पात्रता फेरीत खेळावं लागलं. मात्र त्यानंतर विंडिजला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र विंडिजला आगामी 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट एन्ट्री मिळाणार आहे. तसेच यूएसएसलाही संधी मिळेल . इतकंच नाही, तर या आगामी वर्ल्ड कपमध्ये नव्या फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाची संख्या 20 असण्याची शक्यता आहे. (t 20 world cup 2024 format will be change know new rules cricket news)
नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघ सहभागी झाले होते. मात्र या आगामी वर्ल्ड कपमध्ये 20 टीम्स असू शकतात. या 20 संघांना 5 ग्रुपमध्ये विभागण्यात येईल म्हणजेच प्रत्येक ग्रुमपमध्ये 5 टीम असतील. प्रत्येक ग्रुपमधील पहिले 2 संघ सुपर 8 राउंडसाठी पात्र ठरतील. यानंतर प्रत्येक ग्रृपमधील पहिले 2 संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय करतील.
दरम्यान टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टॉप 8 मध्ये असल्याच्या निकषानुसार, टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि नेदरलँडलने 2024 च्या वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलंय. सोबतच अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोघांपैकी जी टीम सर्वश्रेष्ठ असेल, ती क्वालिफाय करेल. तर उर्वरित संघ पात्रता फेरीतून ठरतील.