T 20 world Cup Final 2021 | कॅप्टन केन विलियम्सनची वादळी खेळी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान

न्यूझीलंडकडून (New Zealand) कर्णधार केन विलियम्सनने (Kane Williamson) सर्वाधिक 85 धावांची वादळी खेळी केली.

Updated: Nov 14, 2021, 09:11 PM IST
T 20 world Cup Final 2021 | कॅप्टन केन विलियम्सनची वादळी खेळी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान title=

दुबई : कर्णधार केन विलियम्सनच्या (Kane Williamson) वादळी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने (New Zealand) टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात (T 20 world Cup Final 2021) ऑस्ट्रेलियाला (Australia) विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 172 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कर्णधार केनने सर्वाधिक 85 धावांची वादळी खेळी केली. तर सलामीवीर मार्टिन गुप्टीलने 28 रन्स केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 3 विकेट्सने घेतल्या. (T 20 world Cup final 2021 new zealand set 173 runs target for win australia at dubai cricket stadium)  

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : एरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श,  स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झॅम्पा आणि जोश  हेझलवूड 

न्यूझीलंडचे शिलेदार : केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिल गुप्टील, डेरील मिचेल, टीम सायफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्न, टीम साऊथी, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.