सिडनी : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेतील (T20 World Cup Final 2021) अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (Australia Vs NewZealand) यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा अंतिम सामना सुरु असताना एक आश्चर्यकारक वृत्त समोर आलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या स्पर्धेचं आयोजन हे अमेरिकेत खेळवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जर असं झालं तर क्रिकेट विश्वातील अनेक महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयांपैकी हा एक निर्णय असेल. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी (ICC T20 World Cup 2024) यूएएस क्रिकेट (USA Cricket) आणि वेस्टइंडिज क्रिकेट बोर्ड (Cricket West Indies) एकत्र बोली लगावू शकतात. (United States of America likely be host icc t 20 world cup 2024 to enter in los angeles olympics 2028 america)
क्रिकेटचा ऑल्मिपिकमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या एका रिपोर्टनुसार, क्रिकेट गव्हर्नर यूएसएसला पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान देऊ शकतात. क्रिकेटला 2028 च्या लॉल एंजिल्समध्ये होणाऱ्या ऑल्मिपिक स्पर्धेत स्थान मिळण्यासाठी हातभार लागवा, या उद्देशाने यूएसएला हे यजमानपद मिळू शकतं.
यूएसएमध्ये क्रिकेटचा विस्तार होणार?
रिपोर्टनुसार, टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं अशा ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, ज्या ठिकाणी अजूनही क्रिकेटबद्दल माहित नाही किंवा त्याचा विस्तार झाला नाही आणि यूएसएत आयसीसीची ही स्पर्धा झाल्याने क्रिकेटचा विस्तार होऊ शकतो.