शारजाह : युएईमध्ये सुरु असलेल्या टी-१० लीगच्या दुसऱ्या मोसमातली फायनल नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये होणार आहे. या दोन्ही टीम याआधी क्वालिफायर-१ आणि क्वालिफायर-२ची मॅच खेळल्या आहेत. त्या मॅचमध्ये पखतून्सनं नॉर्थन वॉरियर्सचा पराभव केला होता. डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नॉर्थन वॉरियर्सला शाहिद आफ्रिदीच्या पखतून्सकडून पुन्हा एकदा आव्हान मिळणार आहे.
एलिमिनेटर मॅचमध्ये मराठा अरेबियन्सचा पराभव करत नॉर्थन वॉरियर्सनं दिमाखात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. एलिमिनेटर मॅचमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा १० विकेटनं विजय झाला. या मॅचमध्ये मराठा वॉरियर्सनी १० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून ७८ रन केले. नॉर्थन वॉरियर्सनं हे आव्हान एकही विकेट न गमावता ५ ओव्हरमध्येच पूर्ण केलं.
मागच्यावर्षी सुरु झालेली टी-१० सुपर लीग क्रिकेटमधला नवा फॉरमॅट आहे. या स्पर्धेत दोन्ही टीममध्ये १०-१० ओव्हरची मॅच होते. ही मॅच फक्त दीड तास चालते. मागच्यावर्षी शारजाहमध्ये ६ टीममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी टी-१० लीगमध्ये ८ टीम सहभागी झाल्या आहेत. आयोजकांनी यावर्षी स्पर्धेत भाग घेतलेल्या टीमची फी ४,००,००० डॉलरऐवजी १.२ मिलियन डॉलर केली होती.
२३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेची फायनल आता नॉर्थन वॉरियर्स आणि पखतून्समध्ये होणार आहे. पखतून्सनं पहिल्या क्वालिफायरमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. तर नॉर्थन वॉरियर्सनं क्वालिफायर-२ आणि क्वालिफायर-३चे विजेते मराठा अरेबियन्सचाला हरवून एलिमिनेटरमध्ये जागा बनवली. त्याआधी मराठा अरेबियन्सनं बंगाल टायगर्सना ७ विकेटनं हरवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला होता.
-नॉर्थन वॉरियर्स आणि पख्तून्समध्ये होणारी टी-१० लीग फायनल मॅच शारजाहच्या शारजाह क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात २ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.
- ही मॅच भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार ८ वाजता) सुरु होणार आहे.
- या मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण सोनी ईएसपीएन आणि सोनी ईएसपीएन एचडीवर दाखवण्यात येईल.
- मॅचचं ऑनलाईन फ्री प्रसारण सोनी लिव ऍपवरही पाहता येईल.
डॅरेन सॅमी(कर्णधार), आंद्रे रसेल, वहाब रियाज, अमीटोज सिंग, निकोलस पूरन, ड्वॅन स्मिथ, रवी बोपारा, रोवमन पॉवेल, हॅरी गुर्नी, क्रिस ग्रीन, हार्ड्स विल्जोएन, लेंडल सिमन्स, खारी पियरे, केनर लुईस, इमरान हैदर, राहुल भाटिया
शाहिद आफ्रिदी(कर्णधार), लिआम डॉसन, कॅमरून डेलपोर्ट, एंन्ड्र्यू फ्लेचर, गुलबदीन नईब, कॉलीन इंग्राम, मोहम्मद इरफान, मुहम्मद कालेम, शफीकुल्ला शाफक, शापूर जादरान, शराफुद्दीन अशरफ, आरपी सिंग, सोहेल खान, चाडविक वॉल्टन, डेव्हिड विली
टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.