IND vs WA: वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाली असून टीमला 2 सराव सामने खेळावे लागले. यावेळी दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. 169 रन्सचा पाठलाग करताना भारतीय टीमचा 36 रन्सने पराभव झाला. अवघ्या 132 रन्सवर टीमवर ऑलआऊट झाली. यावेळी चाहत्यांनी असा प्रश्न केला की, प्लेईंग 11 मध्ये असूनही रोहित शर्मा फलंदाजीसाठी का उतरला नाही.
कालच्या सामन्यात टीम इंडियाची धुरा के.एल राहुलकडे देण्यात आली होती. या सामन्यात नियमित टीमचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी उतरला नाही. मुख्य म्हणजे तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. रोहित फलंदाजी केली नाही त्यामुळे सोशल मीडियावर चाहते प्रचंड संतापलेत.
दुसऱ्या सराव सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. यावेळी प्लेईंग 11 चा भाग असूनही रोहित शर्मा फलंदाजी आणि फिल्डींगसाठी मैदानात उतरला नाही. याशिवाय विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता.
Where is Rohit sharma??? @SushantNMehta #SportsYaari
— Jagadish (@ghimire_20) October 13, 2022
Rohit Sharma Ko kya hua hai?...
Injured toh n ho gya
— Hardy (@Cricsomaniac) October 13, 2022
रोहित शर्मा प्लेईंग 11 मध्ये असूनही फलंदाजीला आला नाही, हे विचित्र असल्याचं, एका युझरने म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने, रोहित शर्माला दुखापत तर झाली नाही ना, असा सवाल केला आहे.