न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचं 'हा' खेळाडू ठरू शकतो कारण?

कोण आहे हा खेळाडू जो ठरू शकतो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आणि का?

Updated: Oct 27, 2021, 10:40 PM IST
न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचं 'हा' खेळाडू ठरू शकतो कारण?  title=

दुबई: टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताची सामन्याची सुरुवात तर फार भयंकर होती. पाकिस्तानकडून एकहाती विजय तर भारताचा दारूण पराभव झाला. 10 गडी राखून पाकिस्ताननं टीम इंडियावर विजय मिळवला. आता टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यात एक दिलासादायक बाब आहे. ती म्हणजे ब्लॅक कॅप्स संघाचा घातक गोलंदाज मार्टिल गुप्टिल आणि गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाली आहे. 

टीम इंडियाच्या न्यूझीलंड विरुद्ध सामन्याचा विजयाचा मार्ग जरी सोपा वाटत असला तरी आयत्यावेळी बाजी पलटूही शकते. गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा सतर्क राहावं लागणार आहे. टीम इंडियाच्या पराभवाचं कारण एक खेळाडू ठरू शकतो अशी सध्या चर्चा आहे. एकूणच त्याच्या कामगिरीवरून तरी सध्या तो टीमसाठी धोकादायक असल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ नये अशी चर्चाही रंगत आहे. 

टीम इंडियाला 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध सामना खेळायचा आहे. जर भारताला न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकायचा असेल एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. कारण हा खेळाडूही पराभवाचे कारण ठरू शकतो. या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, तर टूर्नामेंटमधून बाहेर जाण्याचा धोका उद्भवू शकतो. अशा परिस्थितीतमध्ये टीम इंडियाला विचारपूर्वक खेळणं आवश्यक आहे. 

खराब फॉर्मची किंमत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा चुकवावी लागली. आता तिच चूक पुन्हा एकदा कोहली करू नये असं सर्वांना वाटत आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा संधी देऊ नये असं क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. 

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने 3 ओव्हर्स बॉलिंग केली. यामध्ये भुवीने 25 धावा पाकिस्तानला काढण्याची संधी दिली. इतकच नाही तर एकही विकेट घेण्यात त्याला यश मिळालं नाही. त्यामुळे भुवीला पुन्हा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात संधी देणं हे टीमसाठी धोक्याचं ठरू शकतं असा कयास आहे. 

भुवनेश्वर कुमार ऐवजी शार्दूल ठाकुरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायला हवी असाही कयास आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भुवी पुन्हा खेळला तर टीम इंडियाच्या पराभवाचं कारण तो बनू शकतो. त्यामुळे त्याऐवजी शार्दूलला संधी द्यावी असा अनेकांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात काय बदल होणार हे रविवार निश्चित होईल. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं आहे.