पर्थ : गेल्या 16 ऑक्टोंबरपासून वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरूवात होताच धक्कादायक निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. अनपेक्षित असे संघ सामन्यात विजय मिळवून आपली विजयाची दावेदारी पेश करतायत.असाच एक धक्कादायक निकाल आता समोर आला आहे. दोन वेळा वर्ल्ड कप चॅम्पियन (T20 World Cup) ठरलेला संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कप संघातून बाहेर पडणारा हा संघ नेमका कोणता आहे? व तो वर्ल्ड कपमधून कसा बाहेर पडला हे जाणून घेऊयात.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सध्या क्वालिफाय सामने सुरू आहेत. या क्वालिफाय सामन्यात धक्कादायक निकाल हाती येत आहेत. त्यात आता सुपर 12 सामन्यापुर्वीच एक दिग्गज संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना मोठा झटका बसला आहे.
हे ही वाचा : क्वालिफायच गणित सुटलं! भारताच्या ग्रुपमध्ये 'या' दोन संघाची एन्ट्री
T20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) मधील सुपर 12 सामन्यांपूर्वी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. क्वालिफाय सामन्यांमध्येच दोन वेळचा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज (West Indies)
टी-20 वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
हे ही वाचा : 'या' क्रिकेट टीमच्या बसला भीषण अपघात
आयर्लंडविरुद्ध (Ireland) खेळलेला सामना वेस्ट इंडिजसाठी (West Indies) करो किंवा मरो असा होता. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने (West Indies) 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 146 धावा केल्या.आयर्लंडच्या (Ireland) संघाने हे लक्ष्य 17.3 ओव्हरमध्ये 1 गडी गमावून पूर्ण करत वेस्ट इंडिजला या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.
वेस्ट इंडिज (West Indies) संघाला 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) क्वालिफाय सामन्यांमध्ये आयर्लंडविरुद्ध (Ireland) पराभवाला सामोरे जावे लागले होते. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ सुपर 12 सामन्यापूर्वी या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.2012 आणि 2016 मध्ये वेस्ट इंडिज संघाने T20 विश्वचषक जिंकला होता.
दरम्यान वेस्ट इंडिज (West Indies) सारखा दिग्गज संघ स्पर्धेतून बाहेर पडणे, हा फार धक्कादायक निकाल आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.