Team India : आयसीसी T20 World Cup 2022 ला आजपासून सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) भूमीवर होणाऱ्या या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांपैकी 8 संघ थेट ग्रुप-12 साठी पात्र ठरले आहेत, तर उर्वरित 4 संघ पात्रता फेरी जिंकून आपलं स्थान निश्चित करतील. त्यामुळे आता क्रिडाविश्वात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना नक्की किती रक्कम (T20 world cup 2022 prize money) मिळणार? असा सवाल उपस्थित होत असताना मोठी माहिती समोर आली आहे.
ICC ने दिलेल्या माहितीनुसार, T20 विश्वचषक जिंकणाऱ्या (T20 World Cup 2022 Winner) संघाला 1.6 दशलक्ष डॉलर मिळतील तर, उपविजेत्या (T20 World Cup 2022 runner-up) संघाला 8 लाख डॉलर मिळणार आहेत. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या उर्वरित दोन संघांना 4-4 लाख डॉलर दिले जातील. T20 विश्वचषकासाठी एकूण 5.6 दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
सेमीफायनलपर्यंत (T20 World Cup 2022 Semifinal) न पोहोचणाऱ्या 8 संघांना आयसीसीकडून (ICC) बक्षीसही देण्यात येणार आहे. या संघांना 70 हजार डॉलर्स दिले जातील. मागील वर्ल्ड कपवेळी ही रक्कम 40 हजार डॉलर होती. जे चार संघ पहिल्या राऊंडमधून बाहेर होतील, त्यांना 40 हजार डॉलर देण्यात येणार आहे. पहिल्या डावात एकून 12 सामने होणार आहेत. त्यात 4.8 लाख डॉलरची बक्षिस देण्यात येतील.
आणखी वाचा - T20 World Cup: मोठी बातमी। कोरोना Positive प्लेयरही खेळू शकणार मॅच
दरम्यान, येत्या 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये (India VS Pakistan) सामना खेळला जाणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन संघ या सामन्यासाठी कसून तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे आता सर्वजण येत्या रविवारची वाट पाहत आहे. भारतीय संघाची गोलंदाजी सध्या जखमी असल्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) पर्यायी खेळाडूंच्या नावावर भर देताना दिसतोय.