Sport News : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंतिम चेंडूपर्यंत गेलेल्या श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यामध्ये भारताने थरारक विजय मिळवला होता. या सामन्याचा शिल्पकार स्टार खेळाडू विराट कोहली ठरला. विराटने नाबाद 82 धावांची खेळी करत तो पाकिस्तानला एकटा पुरून उरला. पाकिस्तानला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो मात्र आता तर त्याने हद्दच केली आहे.
काय म्हणाला शोएब अख्तर?
कोहलीने आता T20 मधून निवृत्ती घ्यावी अशी माझी इच्छा आहे. विराटने त्याची सर्व ताकद टी-20 फॉरमॅटमध्ये वाया नको घालवायला, असं मला वाटत आहे. मेलबर्नमध्ये कोहलीने पाकिस्तानविरुद्ध जेवढी ताकद लावली, तीच ताकद एकदिवसीय सामन्यांमध्ये वापरली तर तो अधिक शतके करू शकतो, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
विराटची मागील तीन वर्षे खराब गेली यामध्ये त्याचं कर्णधारपदही काढण्यात आलं होतं. मात्र आता तो पुन्हा एकदा परतला असून आपण किंग त्यांने सर्वांना आपल्या कामगिरीने पटवून दिल्याचंही शोएब म्हणाला.
शोएबने त्याच्या यु-ट्यूब चॅनेवर बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शोएबच्या या बकवास वक्तव्यानंतर त्याला भारतीय फॅन्सने चांगलंच फैलावर घेतलं आहे. विराटने एकट्याने मैदनावर थांबत पाकिस्तानच्या पारड्यात झुकलेला सामना भारताला जिंकून देत 130 कोटी भारतीयांना दिवाळीला विजयाचं खास गिफ्ट दिलं.