T20 WC 2022: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची (T20 World Cup 2022). क्रिकेटच्या या महाकुंभात सोळा संघांनी सहभाग घेतला असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वच संघांनी आपली रणनिती तयार केली आहे.
क्रिकेटप्रेमींना सामन्यांची जितकी उत्सुकता असते तितकीच उत्सुकता असते आपला आवडता खेळाडू रहातो कसा, तो किती श्रीमंत आहे. यासाठी आम्ही T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 8 संघांच्या कर्णधारांची कमाई किती आहे याची माहिती देणआर आहोत. भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांच्या कर्णधाराची कमाई किती आहे, पाहा कोण कुठल्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा
क्रिकेट जगतात सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक लागतो तो भारतीय कर्णधाराचा. टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं (Team India) नेतृत्व करतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांबरोबरच जाहीरातींमधूनही रोहितचं उत्पन्न होतं. रोहितची एकूण संपत्ती 191 कोटी इतकी आहे.
शाकिब उल हसन
श्रीमंत क्रिकेटपटू्ंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा (Bangladesh) कर्णधार शाकिब उल हसनचा (Shakib Al Hasan) नंबर लाकतो. शाकिबची एकूण संपत्ती 177 कोटी इतकी आहे.
जोस बटलर
इंग्लंडचा (England) एकदिवसीय आणि टी20 संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) तिसऱ्या स्थानावर आहे. बटलरच 79.9 कोटी रुपयांचा मालक आहे.
अॅरोन फिंच
क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलिया (Australia) नंबर वनची टीम असली तरी त्या टीमचा कर्णधार कमाईच्या आकड्यांमध्ये मात्र चौथ्या क्रमांकावर आहे. अॅरोन फिंचची (Aaron Finch) एकूण संपत्ती 78 कोटी रुपये इतकी आहे.
केन विल्यम्सन
न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याची एकूण कमाई 58 कोटी रुपये इतकी आहे.
टेम्बा बावुमा
दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) 39.8 करोडचा मालक आहे. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.
बाबर आझम
बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तानचा (Pakistan) सर्वात महागडा क्रिकेटपटू आहे. पण श्रीमंत खेळाडूंच्या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. बाबर आझमच्या कमाईचा आकडा आहे 32 कोटी रुपये.
मोहम्मद नबी
अफगाणिस्तानचा (Afghanistan) कर्णधार मोहम्मद नबी (Mohammad Nabi) कमाईच्या आकड्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. त्याची एकूण संपत्ती 12 कोटी रुपये इतकी आहे.
सर्व कर्णधारांच्या उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे त्यांच्या क्रिकेट बोर्डाचे करार, आंतरराष्ट्रीय सामने आणि जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न हे आहे.